Ajay Devgn RRR Look | वाढदिवशी प्रेक्षकांना मोठे रिटर्न गिफ्ट, पाहा अजय देवगणचा ‘RRR’ लूक!

या आधी या चित्रपटातील अभिनेता राम चरण, ज्यूनियर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा फर्स्ट लूक रिलीज केला गेला आहे.(Ajay Devgan’s first look in RRR movie released)

Ajay Devgn RRR Look | वाढदिवशी प्रेक्षकांना मोठे रिटर्न गिफ्ट, पाहा अजय देवगणचा ‘RRR’ लूक!
अजय देवगण
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 12:16 PM

मुंबई : चित्रपट विश्वात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या RRR या चित्रपटाची! या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) तेलुगु मनोरंजन विश्वात डेब्यू करत आहे. आज (2 एप्रिल) अजय आपला वाढदिवस साजरा करत आहे. अशावेळी या खास दिवशी त्याने आपल्या चाहत्यांना एक मोठे रिटर्न गिफ्ट दिले आहे. बहुचर्चित ‘RRR’ या चित्रपटातील अजय देवगणचा लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे (Ajay Devgn first look in RRR movie released).

आज त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द अजयनेच आपल्या वाढदिवशी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून ‘RRR’चा फर्स्ट लूक रिलीज करणार असल्याचे म्हटले होते.

पाहा अजयचा जबरदस्त लूक!

(Ajay Devgn first look in RRR movie released)

या आधी या चित्रपटातील अभिनेता राम चरण, ज्यूनियर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा फर्स्ट लूक रिलीज केला गेला आहे.(Ajay Devgan’s first look in RRR movie released)

याबद्दल सांगताना अजय म्हणाला होता की, “RRR चित्रपटाचा हिस्सा बनून एक खूपच उत्साहित अनुभव मिळाला. मी तुम्हा सगळ्यांना हे सांगताना वाट पाहू शकत नाही की, एसएस राजामौलीने माझी भूमिका कशी रंगवली आहे”, असे ट्वीट अजय देवगणने केले होते.

आलिया भट्टची तेलगू चित्रपटात एन्ट्री

अजय देवगण सोबत आलिया भट्टनेही या चित्रपटाच्या माध्यमातून तेलुगु चित्रपटात एंट्री केलीय. काही दिवसांपूर्वी RRR चित्रपटाच्या निर्मात्यांनी आलिया भट्टचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले होते. आलिया भटचा फर्स्ट लूकही तिच्या वाढदिवसाला म्हणजे 15 मार्च रोजी रिलीज केला होता. आलिया या चित्रपटात सीताची भूमिका साकारणार आहे.

RRR मधील स्टारकास्ट

आलिया भट्ट RRRमध्ये राम चरणच्या आपोझिट भूमिका साकारत आहे. तर, ज्यूनिअर एनटीआर ओलिवियासह रोमांस करताना दिसत आहेत. आलिया भट, अजय देवगण, राम चरण, आणि ज्यूनिअर एनटीआरसह या चित्रपटात समुथिरकानी, ओलिविया मॉरिस, एलिसर डूडी आणि रे स्टीवनसन हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत (Ajay Devgn first look in RRR movie released).

प्रदर्शनाआधीच मोठी कमाई!

‘RRR’ हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली. केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी या चित्रपटाला आतापर्यंत 348 कोटीहून अधिक ऑफर मिळाल्या आहेत. जेव्हापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली, तेव्हापासून चित्रपटाला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राईट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. निजाममध्ये 75 कोटी, आंध्र प्रदेशात 165 कोटी, तामिळनाडूमध्ये 48 कोटी, मल्याळममध्ये 15 कोटी आणि कर्नाटकमध्ये 45 कोटी हा सर्व आकडा मिळून 348 कोटी रुपये होत आहे. तसेच या चित्रपटाला बॉलिवूडकडून देखील मोठ्या ऑफर्सही मिळत आहेत.

(Ajay Devgn first look in RRR movie released)

हेही वाचा :

Happy Birthday Ajay Devgn | बिग बींच्या घरासमोर दाखवायचा स्टंट, आता बॉलिवूडच’सिंघम’ म्हणून ओळखला जातोय अजय देवगण!

Amitabh Bachchan vaccine : बिग बी सहकुटुंब लसीकरणाला, मात्र ‘या’ कारणामुळे अभिषेकला लस घेता आली नाही!

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.