AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी 18 वर्षांची असताना…’, दिशा पाटनीने समोर आणला करण जोहरचा खरा चेहरा

Disha Patani Speaks On Karan Johar : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्यावर अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. आता अभिनेत्री दिशा पाटनी हिने देखील करणचा खरा चेहरा समोर आणला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा पाटनी हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

'मी 18 वर्षांची असताना...', दिशा पाटनीने समोर आणला करण जोहरचा खरा चेहरा
| Updated on: Mar 02, 2024 | 8:41 AM
Share

मुंबई | 2 मार्च 2024 : बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील मोठ्या गोष्टीमुळे करण चर्चेत आला आहे. नुकताच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘योद्धा’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये करण जोहर याच्यासोबत राशी खन्ना आणि दिशा पाटनी देखील उपस्थित होती. एवढंच नाही तर, सिनेमातील प्रत्येक कलाकार ट्रेलर लॉन्चसाठी उपस्थित होता. दरम्यान दिशाने करणचं मोठं सत्य सर्वांना सांगितलं. सध्या सर्वत्र दिशाच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

दिशा पाटनी करियरच्या आणि मॉडेलिंगच्या दिवसांबद्दल आठवत म्हणाली, ‘आज मी अभिनेत्री आहे, तर फक्त आणि फक्त करण जोहरमुळे… कारण माझ्या मॉडेलिंगच्या दिवसांत त्यांच्यावर लक्ष दिलं. तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होती. जर करणने मला संधी दिली नसती तर, मी इंडस्ट्रीमध्ये नसती…’

‘लोकं कायम करणवर आरोप करत असतात. मी बाहेरुन आलेली व्यक्ती आहे. पण करणने मला संधी दिली..’ दिशाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत सिद्धार्थ मल्होत्राने करणला मिठी मारली आणि ‘आय लव्ह यू’ म्हणाला. सिद्धार्थ म्हणाला, ‘दिशा बरोबर बोलत आहे…’ सध्या सर्वत्र करण जोहर याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, करण जोहर याने ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवू़डमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर दिशा हिने देखील 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमात सहाय्यक भूमिकेत दिसली होती. आज दिशाला कोणत्या ओळखीची गरज नाही.

नेपोटिज्मवर करण जोहर याची प्रतिक्रिया

रिपोर्टनुसार, करण कार्यक्रमात नेपोटिज्ममुळे होणाऱ्या आरोपांवर म्हणाला, ‘जी लोकं आरोप करतात की आम्ही फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम करतो, तर शशांक खेतान आउटसाईडर आहेत. ‘योद्धा’ सिनेमाचे दिग्दर्श सागर आणि पुष्कर देखील आउटसाईडर कालाकारांचं प्रतिनिथित्व करतात. योद्धा सिनेमाचा लिड अभिनेता आउटसाईडर आहे…’ असं देखील करण म्हणाला.

सांगायचं झालं तर, अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर घराणेशाही आणि गटबाजी यावर अनेक चर्चा रंगल्या. ज्यामुळे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावर देखील कायम करण जोहर याच्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....