AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : कोण आहे अक्षय खन्ना याची सावत्र आई आणि भाऊ? बापाने कोणासोबत थाटलेला दुसरा संसार?

Dhurandhar : 'धुरंधर' फेम रेहमानचा सावत्र भाऊ कोण, अक्षय खन्नाच्या बापाने कोणासोबत थाटलेला दुसरा संसार? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...

Dhurandhar : कोण आहे अक्षय खन्ना याची सावत्र आई  आणि भाऊ? बापाने कोणासोबत थाटलेला दुसरा संसार?
Akshaye Khanna
| Updated on: Dec 12, 2025 | 2:47 PM
Share

Dhurandhar : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे…  ‘धुरंधर’ सिनेमामुळे अभिनेता अक्षय खन्ना याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. ‘छावा’ सिनेमानंतर अक्षय याने ‘धुरंधर’ सिनेमात देखील दमदार भूमिका साकारली आहे… दोन्ही सिनेमात एकापेक्षा एक भूमिका साकारत अक्षय याने चाहत्यांना अवाक् केलं आहे. प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत अल्याने अक्षयच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे…अक्षय खन्ना याच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याच्या वडिलांचं नाव विनोद खन्ना होतं. विनोद खन्ना देखील बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते… विनोद खन्ना यांच्या दोन मुलांबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना… पण अभिनेत्याची सावत्र आई आणि भावाबद्दल फार कोणाला माहिती नाही. अक्षय याच्या सावत्र भावाचं नाव साक्षी खन्ना असं आहे…

सांगायचं झालं तर, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी दोन वेळा लग्न केलं… विनोद खन्ना यांनी दुसरं लग्न कविता खन्ना यांच्यासोबत केलं… विनोद आणि कविता यांच्या मुलाचं नाव साक्षी खन्ना असं आहे… 12 मे 1991 मध्ये साक्षी याचा जन्म मुंबईत झाला… साक्षी याने देखील वडील आणि भावाप्रमाणे मोठ्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अपयश मिळालं. सांगायचं झालं तर, अक्षय याला सावत्र बहीण देखील आहे. तीचं नाव श्रद्धा असं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sakshi Khanna (@svkhanna)

रिपोर्टनुसार, दिग्दर्शक संजस लिला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ या सिनेमात साक्षी याने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली… त्यानंतर साक्षी याने अभिनयात देखील स्वतःचा नशीब आजमावला… पण त्याला यश मिळालं नाही.

साक्षीने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केलं. त्यानंतर तोअध्यात्माकडे वळला, ज्यामुळे जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला. अशात त्याने नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पण सोशल मीडियावर साक्षी कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

साक्षीचे सोशल मीडियावर 14,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर, शर्वरी, कियारा अडवाणी, सूरज पांचोली, अथिया शेट्टी आणि निधी अग्रवाल यांसारखे सेलिब्रिटी साक्षी याला सोशल मीडियावर फॉलो करतात..

अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.