‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात सलमान खानमुळे कोण झालेलं जखमी? त्याने जोरात दरवाजा आपटला आणि…
Sheeba Chaddha said about Salman Khan: 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील किस्सा, सलमान खानने जोरात दरवाजा आपडला, ती व्यक्ती खाली पडली, जखमी झाली आणि..., सलमान खान कायम असतो चर्चेत

Sheeba Chaddha said about Salman Khan: अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेक कारणांमुळे अभिनेता वादग्रस्त प्रकरणात देखील अडकला. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात देखील सलमान खान याच्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झालेली. सांगायचं झालं तर, एका मुलाखतीत अभिनेत्री शीबा चड्ढा यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातील एक किस्सा सांगितला. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, सलमान खान याने असं काही केलं ज्यामुळे एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली.
अभिनेत्री शीबा म्हणाली, ‘सलमान खान याचा राग प्रचंड भयानक आहे. मला आठवत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या सेट सलमान अडखळला आणि पडला…. त्यानंतर रागात सेटवरुन निघून गेला. त्याने दरवाजा इतक्या जोरात आपटला की, मागे उभा असलेला एक वृद्ध व्यक्ती खाली पडला आणि जखमी झाला. ते पाहून मी हैराण झाली होती…’
एवढंच नाही तर, सिनेमातील एका सीनमध्ये सलमान खान याने शीबा यांना मिठी मारण्यास नकार दिला. त्यानंतर दिग्दर्शक संजय भन्साळी यांनी सलमान याच्यासोबत बोलावं लागलं… त्यानंतर सीन पूर्ण झाला. सांगायचं झालं तर, ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे अभिनेता चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात राहिला.
‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यामध्ये प्रेम बहरलं. सिनेमातील दोघांच्या केमेस्टिला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. एवढंच नाहीतर, खऱ्या आयुष्यात देखील दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली होती. सलमान – ऐश्वर्या यांच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगू लागल्या. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
दोघांच्या नात्याचा अंत देखील प्रचंड वाईट झाला. ऐश्वर्याने सलमान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केलं. शिवाय पोलिसांपर्यंत दोघांचे वाद गेले. अखेर दोघांचं नातं कायमचं संपलं. सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. आज ऐश्वर्या पती आणि लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. तर सलमान खान आजही एकटाच आयुष्य जगत आहे.
