‘डॅडी’ अरुण गवळी आजोबा होणार, अभिनेता अक्षय वाघमारेकडून गुड न्यूज

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात अडकले. (Arun Gawli Grandfather Akshay Waghmare )

'डॅडी' अरुण गवळी आजोबा होणार, अभिनेता अक्षय वाघमारेकडून गुड न्यूज
अक्षय वाघमारे योगीता गवळी

मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawli) आजोबा होणार आहे. अरुण गवळीचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारेने (Akshay Waghmare) इन्स्टाग्रामवरुन गुड न्यूज शेअर केली. अक्षयची पत्नी योगिता गवळी-वाघमारे (Yogita Gawli) हिचं डोहाळ जेवण झालं. (Don Arun Gawli to become Grandfather Actor Akshay Waghmare Yogita Gawli to become parents)

लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात अडकले. 8 मे रोजी मुंबईत अक्षय-योगिता यांचा विवाह सोहळा झाला. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.

दगडी चाळीत लग्न

अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी होती. अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला. कन्यादान करताना अरुण गवळी भावूक झाल्याचंही दिसलं होतं.

पाहा इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

कोण आहे अक्षय वाघमारे?

अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे.

संबंधित बातम्या :

अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना ‘डॅडी’ भावूक

डॅडींना न्यायदेवतेने सोडावं, अरुण गवळीच्या पत्नीचं देवीचरणी साकडं

(Don Arun Gawli to become Grandfather Actor Akshay Waghmare Yogita Gawli to become parents)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI