शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड झाली आहे

शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड

मुंबई : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड झाली आहे (Dr. Jabbar Patel). नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि मंगेश कदम यांनी ही घोषणा केली आहे (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan).

अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी अशी दोन नावे चर्चेत होती. पण कार्यकारणी समितीच्या बैठकीत एकमताने डॉ. जब्बार पटेल यांची निवड झाली.

येत्या 15 डिसेंबरला होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या बैठकीत 100 व्या नाट्यसंमेलन कुठे होणार याबद्दल मात्र निर्णय झालेला नाही.

दरम्यान, हिंदी आणि मराठीतील डॉ.जब्बार पटेल हे मोठं नावं आहे. त्यांची नाट्यसंमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे रंगकर्मींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. जब्बार पटेल यांनी अनेक नाटक आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘एक होता विदूषक’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, संविधानाचे शिल्पकार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचाही प्रवास त्यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी त्यांनी थिएटर अकादमी ही संस्थाही स्थापन केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *