Drishyam 2: या वर्षातील 8 चित्रपटांना ‘दृश्यम 2’ने टाकलं मागे; कमाईची जबरदस्त सुरुवात

'दृश्यम 2'ची बंपर ओपनिंग; जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

Drishyam 2: या वर्षातील 8 चित्रपटांना 'दृश्यम 2'ने टाकलं मागे; कमाईची जबरदस्त सुरुवात
Drishyam 2Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 7:59 AM

मुंबई- अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग पाहता पहिल्या दिवशी जवळपास 12 कोटी रुपयांची कमाई होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र दृश्यम 2 ने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच चकीत केलं. अजय देवगण आणि अक्षय खन्ना यांचा हा चित्रपट या वर्षभरातील सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.38 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी 15 कोटींपेक्षा जास्त कमाई करणं ही खूप चांगली बाब आहे. मात्र दृश्यम 2 हा चित्रपट रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ला मागे टाकण्यात अपयशी ठरली. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या चित्रपटाची ओपनिंग कमाई ही जवळपास 36 कोटी रुपये इतकी झाली होती. त्यामुळे या वर्षातील सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा पहिला चित्रपट ब्रह्मास्त्र तर दुसरा दृश्यम 2 ठरला आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, दृश्यम 2 ने जवळपास आठ चित्रपटांना मागे टाकलं आहे. हे चित्रपट कोणते ते पाहुयात..

हे सुद्धा वाचा

राम सेतू- 15.25 कोटी रुपये भुल भुलैय्या 2- 14.11 कोटी रुपये बच्चन पांडे- 13.25 कोटी रुपये लाल सिंग चड्ढा- 11.70 कोटी रुपये सम्राट पृथ्वीराज- 10.70 कोटी रुपये विक्रम वेधा- 10.58 कोटी रुपये गंगुबाई काठियावाडी- 10.50 कोटी रुपये शमशेरा- 10.25 कोटी रुपये

दृश्यम आणि दृश्यम 2 हे साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचे हिंदी रिमेक आहेत. 2015 मध्ये दृश्यम हा चित्रपट प्रदर्शित झाला. सीक्वेलमध्ये अजय देवगण आणि अक्षय खन्नासोबत श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर यांच्या भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.