AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: शेवटच्या काही सेकंदांत असं काय दिसलं? थिएटरमध्येच रडू लागली ‘दृश्यम 3’ दिग्दर्शकाची पत्नी

Drishyam 3: अभिषेक पाठक दिग्दर्शित 'दृश्यम 3' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट पहायला गेलेल्या अभिषेकच्या पत्नीला थिएटरमध्ये एक गोष्ट पाहून रडू कोसळलं. याविषयीचा व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.

Drishyam 3: शेवटच्या काही सेकंदांत असं काय दिसलं? थिएटरमध्येच रडू लागली 'दृश्यम 3' दिग्दर्शकाची पत्नी
drishyam 3Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2026 | 11:43 AM
Share

Drishyam 3: अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3: द कन्क्लुजन’ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई सुरू आहे. मात्र या चित्रपटाशी संबंधित एक भावनिक क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांची पत्नी आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयने ‘दृश्यम 3’ थिएटरमध्ये पाहताना आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. शिवालिकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती थिएटरमध्ये बसून चित्रपटाचे एंड क्रेडिट्स पाहताना दिसत आहेत. याच वेळी पडद्यावर अभिषेक पाठक यांनी शिवालिकासाठी लिहिलेला खास संदेश दिसतो. हा संदेश पाहताच ती भावुक झाली आणि तिच्या डोळ्यांत पाणी आलं.

‘दृश्यम 3’च्या शेवटच्या क्रेडिट्समध्ये अभिषेक यांनी पत्नी शिवालिकाचे आभार मानले आहेत. चित्रपटाच्या प्रवासात तिने दिलेला पाठिंबा आणि त्याच्यावर ठेवलेला विश्वास यासाठी त्यांनी तिचे आभार व्यक्त केले. त्यांची मुलगी आरिकाचाही यात विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हा खास संदेश मोठ्या पडद्यावर पाहताना शिवालिकाला भावना अनावर झाल्या. व्हिडीओसोबत शिवालिकाने लिहिलेल्या पोस्टमध्ये तिने या संपूर्ण प्रवासाची आठवण सांगितली.

पहा व्हिडीओ-

अभिषेकने ‘दृश्यम 3’वर काम सुरू केल्यापासून त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हानात्मक प्रसंग आले. त्याग, कठीण दिवस, एकमेकांपासून दूर राहण्याचे क्षण आणि अनेक कसोट्या या काळात आल्या. मात्र या सगळ्या काळात आपण अभिषेकवर आणि त्याच्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनावर विश्वास ठेवला, असं शिवालिकाने सांगितलं. अभिषेकने तयार केलेल्या चित्रपटाला आता प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना पाहून त्या काळातील प्रत्येक कठीण क्षण सार्थकी लागल्याची भावना शिवालिकाने व्यक्त केली. विशेष म्हणजे, त्यांची मुलगी आरिका मोठी झाल्यावर वडिलांनी ‘दृश्यम’सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्याचा तिला अभिमान वाटेल, असा भावनिक उल्लेखही शिवालिकाने केला.

अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांनी 2023 मध्ये लग्न केलं होतं. दोघांची ओळख ‘खुदा हाफिज’च्या निमित्ताने झाली होती. याच वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी मुलगी आरिकाच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांना दिली. ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार वाटचाल दरम्यान, ‘दृश्यम 3: द कन्क्लुजन’मध्ये अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे. तब्बू, श्रिया सरन, राजत कपूर यांच्यासह जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक पाठक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने भारतात 175 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न