Drugs Case | हर्ष-भारतीची वैद्यकीय चाचणी, ड्रग्ज प्रकरणी कोर्टात हजर करणार!

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचीया आणि कॉमेडियन भारती सिंह यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे

Drugs Case | हर्ष-भारतीची वैद्यकीय चाचणी, ड्रग्ज प्रकरणी कोर्टात हजर करणार!

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचीया (Harsh Limbachiyaa) आणि कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. थोड्याच वेळात त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीस उशीर झाल्यानंतर त्यांना थेट कोर्टात नेले जाणार आहे. तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयाला अटक करण्यात आली. भारती आणि हर्षच्या घरात 86 ग्रॅम गांजा सापडला होता. त्यानंतर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचियाला  एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भारतीला अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता हर्षलाही अटक करण्यात आली आहे (Drugs Case Bharti Singh And Harsh Limbachiyaa Arrest Live Update).

या दोघांच्या अटकेनंतर आज त्यांना हॉलिडे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल हर्ष आणि भारतीला NCB ने  समन्स बजावले होते. त्यानंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतलं.

संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे. तर तिच्या पतीची म्हणजे हर्षची चौकशी सुरु होती. या चौकशीत ते दोघेही गांजाचे सेवन करत असल्याचे उघड झालं आहे. तब्बल 17 तास तिची चौकशी केल्यावर हर्षला अटक करण्यात आली आहे (Drugs Case Bharti Singh And Harsh Limbachiyaa Arrest Live Update).

ड्रग्ज तस्कराने घेतले भारती-हर्षचे नाव

एनसीबीने काल खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग हिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. तर, हर्षची चौकशी सुरु होती. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.

(Drugs Case Bharti Singh And Harsh Limbachiyaa Arrest Live Update)

संबंधित बातम्या :

Drugs Case | गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक

Harsh Limbachiyaa Arrest | कॉमेडियन भारती सिंहपाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक, NCB कडून तब्बल 17 तास चौकशी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *