Tiger 3 | दबंग खानच्या चित्रपटात इमरान हाश्मी व्हिलनच्या भूमिकेत !

दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif)  'टायगर 3' (Tiger 3) हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असून मार्चमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याची चर्चा आहे.

Tiger 3 | दबंग खानच्या चित्रपटात इमरान हाश्मी व्हिलनच्या भूमिकेत !

मुंबई : दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif)  ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असून मार्चमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. चाहेत देखील ‘टाइगर 3’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून निर्माते चित्रपटातील व्हिलनच्या भूमिकेसाठी नवीन चेहरा शोधत होते. (Emraan Hashmi in the role of a villain in the movie Tiger 3)

आता याच संदर्भात मोठी बातमी आली आहे, टायगर 3 या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेमध्ये इमरान हाश्मी दिसणार आहे. ‘टायगर 3’ चित्रपटाचे पहिले वेळापत्रक मार्च 2021 च्या तिसर्‍या आठवड्यात मुंबईत होईल. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर ‘टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे असे सांगितले जात आहे.

‘पठाण’ चित्रपटात सलमान खानची काही मिनिटांची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. इमरान हाश्मी मार्चमध्येच या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे दुसरे वेळापत्रक मिडल इस्टमध्ये असण्याची शक्यता असून तिसरे आणि शेवटचे वेळापत्रक पुन्हा मुंबईत होणार आहे. मध्यंतरी एक बातमी होती की, या चित्रपटाचे शूटिंग युएईमध्ये होईल, पण आता चित्रपटाचे शूटिंग इस्तानबुलमध्ये होणार आहे.

चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्राने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. कारण युएईमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणूनच आदित्य यांनी चित्रपटाचे शूटिंग इस्तानबुलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्याने चित्रपटाची टीम रेकीसाठी तुर्कीला पाठविली आहे. अबूधाबी आणि दुबईमध्ये पठाणसाठी रिहॅब येथे यशराज चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमने टायगर 3 साठी रेकी देखील केली आहे. त्याचबरोबर सलमानने चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे.

संबंधित बातम्या : 

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

अक्षय कुमारच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सने नाकारलं, आता थिएटरच्या आडोशाला!

टायगर श्रॉफचा धडाकेबाज चित्रपट ‘गनपत’चं पोस्टर रिलीज, पहिल्यांदाच क्रिती सेनॉनचा ‘सुपर अवतार’

(Emraan Hashmi in the role of a villain in the movie Tiger 3)

Published On - 10:39 am, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI