AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Esha Deol | ‘मी सनी देओल यांना वडिलांप्रमाणे मानते, कारण…’, खुद्द ईशाने सांगितलं सावत्र भावासोबत असलेलं नातं

सनी दओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत कसं आहे ईशा हिचं नातं... ईशा देओल हिने सावत्र भावांसोबत असलेलं नातं अखेर सांगितलं... सध्या सर्वत्र देओल कुटुंबाच्या मुलांची चर्चा...

Esha Deol | 'मी सनी देओल यांना वडिलांप्रमाणे मानते, कारण...', खुद्द ईशाने सांगितलं सावत्र भावासोबत असलेलं नातं
| Updated on: Jun 23, 2023 | 4:54 PM
Share

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबाची चर्चा सोशल मीडियावर कायम रंगलेली असते. आता देखील देओल कुटुंब त्यांच्या खासगी गोष्टींमुळे तुफान चर्चेत आलं आहे. नुकताच अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचं गर्लफ्रेंड द्रिशा अचार्या हित्यासोबत लग्न झालं आहे. करण आणि द्रिशा यांच्या लग्नात अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. १८ जून रोजी करण आणि द्रिशा यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली असून त्यांच्या लग्नातील आणि रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण या विवाहसोहळ्यात अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त देओल कुटुंबाची चर्चा रंगत आहे.

करण आणि द्रिशा यांच्या लग्नात ईशा उपस्थित नव्हती, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र अभिनेत्रीने नव्या जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. अशात हेमा मालिनी यांच्या मुलींचं सनी दओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत नातं कसं  आहे याबद्दल चर्चा रंगत आहेत. ईशा आणि अहाना यांच्या लग्नात देओल कुटुंब यांनी हजेरी लावली नव्हती म्हणून आता करण यांच्या लग्नामुळे धर्मेंद्र यांचे दोन्ही कुटुंब चर्चेत आले आहेत…

हेमा मालिनी यांनी २०१७ मध्ये स्वतःची बायोग्राफी लॉन्च केली होती. ज्यामध्ये हेमा मालिनी यांनी सनी देओल याच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला. यावेळी सनी यांचं कौतुक करत हेमा म्हणाल्या होत्या की, ‘चांगल्या – वाईट क्षणी सनी कायम वडिलांसोबत असतात…’

एवढंच नाही तर ईशा देओल हिने देखील मोठा खुलासा केला होता… ईशा म्हणाली होती की, ‘मी सनी आणि बॉबी यांना राखी बांधते.. सनी देओल माझ्यासाठी पितासमान आहेत… सनी देओल आणि माझ्यात काय नातं आहे, हे जगाला सांगण्याची मला काही गरज वाटत नाही… मला माहिती आहे आमच्या नात्याकडे इतरांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे… ‘ असं देखील अभिनेत्री म्हणाली..

सांगायचं झालं तर, ईशा देओल हिने २०१२ मध्ये लग्न केलं. पण अभिनेत्रीच्या लग्नात सनी देओल आणि बॉबी देओल उपस्थित नव्हते… शिवाय तिने दोन्ही सावत्र भावांसोबत फोटो आहेत. पण सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचे दोन्ही कुटुंब एकमेकांसाठी पोस्ट करताना दिसतात… सध्या सर्वत्र हेमा मालिनी आणि प्रकाश कौर यांच्या मुलांची चर्चा रंगत आहे…

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर देखील हेमा मालिनी, धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढल्या नाहीत. शिवाय धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने आद्याप हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केलेला नाही असं देखील अनेकदा समोर आलं… पण ईशा देओल हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण आणि द्रिशा यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.