ईशा देओल हिने सांगितल्या लग्नानंतरच्या वेदना, थेट म्हणाली, लग्नानंतर घरात मी कधीच..

Esha Deol Divorce : हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल ही सध्या तूफान चर्चेत आहे. ईशा देओल हिच्या आयुष्यामध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हेच नाही तर थेट ईशा देओल हिने तिच्या पतीसोबत घटस्फोट घेतलाय. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे.

ईशा देओल हिने सांगितल्या लग्नानंतरच्या वेदना, थेट म्हणाली, लग्नानंतर घरात मी कधीच..
| Updated on: Feb 14, 2024 | 11:39 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ईशा देओल ही तूफान चर्चेत आहे. ईशा देओल हिच्या आयुष्यामध्ये दुखाचा डोंगर कोसळल्याचे बघायला मिळतंय. ईशा देओल हिने पती भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट घेतलाय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती देण्यात आलीये. भरत तख्तानी आणि ईशा देओल यांच्या दोन लेकी आहेत. भरत तख्तानी आणि ईशा देओल यांच्यामध्ये वाद सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. हेच नाही तर यांच्यातील वाद टोकाला गेला आणि शेवटी आता यांचा घटस्फोट झालाय.

ईशा देओल ही भरत तख्तानी यांच्या कुटुंबाबद्दल जाहिरपणे बोलताना दिसते. हेच नाही तर ईशा देओल हिने तिच्या पुस्तकामध्ये बरेच मोठे खुलासे हे केले आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ईशा देओल ही चक्क तिच्या कुटुंबातील वातावरणाबद्दल बोलताना दिसली. ईशा देओल हिचा खुलासा ऐकून सर्वचजण हैराण झाले.

ईशा देओल हिने मुलाखतीमध्ये थेट म्हटले होते की, लग्नानंतर माझ्या आयुष्यात खूप जास्त मोठे बदल झाले. म्हणजे मी लग्नाच्या अगोदर शाॅर्ट कपडे आणि टिशर्ट घरात घालू शकत होते आणि मी तेच घालत होते. मात्र, लग्नानंतर मला कधीच घरात शाॅर्ट कपडे घालता आले नाहीत. रूमच्या बाहेर व्यवस्थित कपड्यांमध्ये बाहेर पडावे लागते.

शाॅर्ट कपडे न घालता येणे हा मोठा बदल लग्नानंतर माझ्या आयुष्यात झाला. म्हणजेच काय तर ईशा देओल हिने स्पष्ट केले की, लग्नानंतर तिला शाॅर्ट कपडे घालण्याची परवानगी अजिबात नव्हती. पुढे ईशाने हा देखील खुलासा केला की, घरातील महिलांना किचनमध्ये जाऊन त्यांच्या पतीचे जेवण तयार करावे लागेत. मात्र, मला कधीही त्यासाठी फोर्स कोणी केला नाही.

ईशा देओल हिने लग्नाच्या काही वर्षे अगोदर भरत तख्तानी याला डेट केले. त्यानंतर यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, आता यांचा घटस्फोट झालाय. घटस्फोटानंतर भरत तख्तानी याच्यावर अनेक गंभीर आरोप हे केले जात आहेत. अनेकांनी थेट म्हटले की, भरत तख्तानी याचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळेच ईशा देओल हिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला आहे.