ऐश्वर्या रायला पाहून चाहतीला रडू आवरेना; ऐश्वर्याने अन् आराध्याने जे केलं ते पाहून सर्वांनाच कौतुक वाटलं
ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहेत. ऐश्वर्याने रडणाऱ्या चाहतीला ज्यापद्धतीने प्रेम दिलं ते पाहून सर्वांनाच तिचं कौतुक वाटत आहे.

बॉलिवूडची प्रतिष्ठित अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिचे सौंदर्य, तिचा अभिनय तसेच तिचे चित्रपट यामुळे तर ती कायम चाहत्यांच्या मनावर राज्य करते. पण ऐश्वर्या ज्यापद्धतीने तिच्या चाहत्यांसोबत वागते त्याबद्दल देखील तिचं नेहमी कौतुक होताना दिसतं. तिने तिच्या चाहत्यांसाठी वारंवार प्रेम आणि आपुलकी दाखवली आहे, या कृतीने अनेकांची मने जिंकली आहेत. तिचे चाहत्यांसोबतचे असे बरेचसे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ आता पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे ज्याचे कौतुक होताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये ती रडणाऱ्या चाहतीस महिला चाहत्याला मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पॅरिसमधील आहे, जिथे अभिनेत्री पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती.
ऐश्वर्या रायचे का होतंय कौतुक
या व्हायरल व्हिडिओमध्ये, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन एका इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहेत, त्याचवेळी तिला एक रडणारी चाहती दिसली. सुरक्षा व्यवस्था तोडून ऐश्वर्या लगेच त्या चाहती धावली आणि तिला मिठी मारली. कारमध्ये बसण्याआधी ऐश्वर्या त्या चाहतीजवळ गेली आणि तिला समजावले. तिच्याशी बोलली. इतकेच नाही तर तिने तिचे अश्रुही पुसले. तिला श्वास घ्यायला सांगितले. तिचा हात हातात घेतला आणि तिच्याबरोबर फोटोसाठी पोजही दिली. त्यानंतर ती आणि आराध्या तिच्या गाडीत बसली. ऐश्वर्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
नेटकरी म्हणाले?
या व्हिडीओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले की “ती खूप गोड आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “क्वीन”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “ती ऐश्वर्या राय आहे. सगळ्यात सुंदर आणि प्रेमळ व्यक्ती आहे”, एका नेटकऱ्याने थेट जया बच्चनशी तिची तुलना करत म्हटलं “जया बच्चन यांच्या तुलनेत ऐश्वर्या खूप दयाळू आहे”
आराध्याचं का होतंय कौतुक?
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे, आराध्या प्रत्येक व्हिडीओमध्ये कॅमेरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. हॉटेलमध्ये जात असताना देखील ती पटकन आत गेली. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर जेव्हा चाहत्यांबरोबर फोटो काढण्यासाठी थांबली तेव्हा आराध्या तिथे थांबली नाही. ती लगेच कारमध्ये बसली.त्यामुळे तिला असलेल्या या जाणीवेबद्दल तसेच तिच्या समजदारपणाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं.
View this post on Instagram
