Good News | लग्नाच्या 10 वर्षानंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याच्या घरी हलला पाळणा! चाहत्यांनी ‘पुत्ररत्ना’ला दिल्या शुभेच्छा!

‘कुल्फिकुमार बाजेवाला’ (Kulfikumar Bajewala) फेम प्रसिद्ध अभिनेता मोहित मलिक (Mohit Malik) आणि त्याची पत्नी आदिती शिरवईकर (Aditi Malik) आता पालक बनले आहेत.

Good News | लग्नाच्या 10 वर्षानंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याच्या घरी हलला पाळणा! चाहत्यांनी ‘पुत्ररत्ना’ला दिल्या शुभेच्छा!
आदिती आणि मोहित मलिक

मुंबई : ‘कुल्फिकुमार बाजेवाला’ (Kulfikumar Bajewala) फेम प्रसिद्ध अभिनेता मोहित मलिक (Mohit Malik) आणि त्याची पत्नी आदिती शिरवईकर (Aditi Malik) आता पालक बनले आहेत. मोहित आणि त्याची पत्नी आदिती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, हे दोघेही आता एका मुलाचे पालक बनले आहेत. त्यांच्या या पोस्टमध्ये, त्याने लिहिले की, ‘धन्यवाद माझ्या प्रिय चिमुकल्या विश्वाचे. रात्रभर रडण्याबद्दल आणि त्यासह या जगात आलेल्या या आश्चर्याबद्दल धन्यवाद. कारण आम्हाला खूप भाग्यवान वाटत आहे की, आम्ही आमच्या मुलाचे या जगात स्वागत केले.’(Famous Tv Actor Mohit Malik And Aditi Malik becomes Parents of baby boy)

मोहित आणि आदिती पुढे लिहितात, शेवटी आपला मुलगा या जगात आला आहे आणि आता आम्ही दोनाचे तीन झालो आहोत. हे आमचे सगळे सुख आहे. वास्तविक मोहित आणि आदितीचे लग्न डिसेंबर 2010 मध्ये झाले होते. अलीकडेच, त्यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या 10 वर्षानंतर ही जोडी पालक बनली आहे. काही महिन्यांपूर्वी मोहितने पत्नीच्या डोहाळेजेवणाची सुंदर छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. हा डोहाळेजेवणाचा विधी पाश्चिमात्य नसून पारंपारिक शैलीत आयोजित केला होता.

पाहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Malik (@mohitmalik1113)

 (Famous Tv Actor Mohit Malik And Aditi Malik becomes Parents of baby boy)

आदितीने आपल्या बाळाबद्दल केली भावनिक पोस्ट

काही दिवसांपूर्वी आदिती शिरवईकर यांनी लिहिले होते, ‘प्रिय मुला, अशा कठीण काळात तू या जगात येत आहेस.. हे अवघड आहे, आव्हानात्मक आहे, व्हायरस-केंद्रित आहे. पण लक्षात ठेव आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर राहू. आम्ही नेहमीच तुझे रक्षण करू. आम्ही आतुरतेने तुझ्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत. तू आमचे आयुष्य खूप सुंदर बनवले आहेस.’

‘मिली’च्या सेटवर झाली भेट

या जोडप्याची पहिली भेट ‘मिली’ (Mili) या मालिकेच्या सेटवर झाली होती. मोहित अखेर स्टार प्लस सीरियल ‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’ मध्ये दिसला होता. मोहित मलिक गेली 15 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत, पण गुल खान निर्मित मालिका ‘कुल्फिकुमार बाजेवाला’ मध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेबद्दल त्याचे खूप कौतुक झाले होते.

(Famous Tv Actor Mohit Malik And Aditi Malik becomes Parents of baby boy)

हेही वाचा :

Backwaters : केरळमधील बेपत्ता लहान मुलाच्या रहस्यमय कथेवरील ‘बॅकवॉटर्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जेव्हा ऋषी कपूर जुही चावलाला म्हणाले ‘इन्सिक्युअर’, अभिनेत्रीने शेअर केला जुना किस्सा…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI