AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khyaal Rakhya Kar | ‘ख्याल रखया कर’ गाण्यांत नेहा आणि रोहनप्रीतच्या क्यूट केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली!

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे आणखी एक गाणे आले आहे. नेहाने काही दिवसांपूर्वीच तिच्या ‘ख्याल रखया कर’ या नवीन गाण्याची घोषणा केली होती.

Khyaal Rakhya Kar |  ‘ख्याल रखया कर’ गाण्यांत नेहा आणि रोहनप्रीतच्या क्यूट केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली!
| Updated on: Dec 22, 2020 | 1:00 PM
Share

मुंबई : बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे आणखी एक गाणे आले आहे. नेहाने काही दिवसांपूर्वीच तिच्या ‘ख्याल रखया कर’ या नवीन गाण्याची घोषणा केली होती. ज्यानंतर चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली असून हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतची सुंदर लव्ह स्टोरी दाखविण्यात आली आहे. (Fans loved the songs of Neha Kakkar and Rohanpreet)

हे गाणे नेहाने गायले आहे आणि गीत बाबूंनी लिहिले आहे. रजत नागपाल यांनी संगीत दिले आहे. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतची बालपणापासूनची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. दोघे शाळेपासून एकत्र असतात आणि नेहा नेहमीच रोहनला भांडण्यापासून दूर नेते. बॉलिवूड सिंगर नेहा कक्करनं (18 डिसेंबर) बेबी बंप फ्लॉन्ट करत पती रोहनप्रीतसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर दोघांनावरही शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

या फोटोसोबत नेहानं ‘ख्याल रखया कर’ असं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे नेहा आणि रोहनप्रीतच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. नेहानं आता तिच्या आगामी गाण्याचं पोस्टर रिलीज केले होते. तर नेहा आता प्रेग्नेंट नसून फोटो शेअर करणं हे तिच्या ‘ख्याल रखया कर’या आगामी गाण्याचं प्रमोशन होते.

या पब्लिसिटी स्टंटमुळे नेहाचे चाहते पुन्हा एकदा तिच्यावर चिडले होते. नेहाच्या या पोस्टवर भाष्य करत ते आपला संताप व्यक्त करत होते. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबरला दिल्लीत लग्न केलं. या लग्नातील प्रत्येक कार्यक्रम संस्मरणीय ठरला. लग्नानंतर नेहाचं तिच्या सासरच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात स्वागत केलं होतं. नेहाच्या स्वागतासाठी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. नेहा आणि रोहनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडमध्ये होते. नेहा आणि रोहन यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितलं की हे दोघं ऑगस्ट 2020 मध्ये ‘नेहू दा व्याह’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान भेटले. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

संबंधित बातम्या :

Photo | नेहाच्या हातावर रोहनप्रीतच्या नावाची मेहंदी, पाहा नेहाच्या मेहंदीचे फोटो

Photo | हळद पिवळी, पोर कवळी, नेहा आणि रोहनप्रीतच्या हळदीचे फोटो

(Fans loved the songs of Neha Kakkar and Rohanpreet)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.