AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांच्या युद्धनीतीचं दर्शन घडवणारा ‘फत्तेशिकस्त’ रचणार नवा इतिहास

'फत्तेशिकस्त' हा मराठी चित्रपट आपल्या अर्काइव्हमध्ये असावा, असा निर्णय 'मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट'ने घेतला आहे.

शिवरायांच्या युद्धनीतीचं दर्शन घडवणारा 'फत्तेशिकस्त' रचणार नवा इतिहास
| Updated on: Feb 18, 2020 | 3:19 PM
Share

मुंबई : लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ हा गाजलेला मराठी चित्रपट एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचा समावेश आता ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’च्या अर्काइव्हमध्ये (Fatteshikast Maratha Light Infantry) करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं दर्शन या चित्रपटातून घडलं होतं.

‘फत्तेशिकस्त’ हा सिनेमा 15 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. प्रोमोमधील रोमांचक संवादांमुळे वाढलेली अपेक्षा ‘फत्तेशिकस्त’ने पूर्ण करण्यात यश मिळवलं. प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील जाणकारांनी केलेल्या कौतुकाच्या वर्षावामुळे हा सिनेमा सर्वदूर पोहोचला. तिकीटबारीवरही या सिनेमाने चांगली कामगिरी केली होती.

‘फत्तेशिकस्त’च्या यशाची आजवर कधीही समोर न आलेली बाजू म्हणजे बेळगावमध्ये जवळपास चार हजार भारतीय जवानांनी हा सिनेमा पाहिला होता. सैन्य दलाचं प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेट्ससोबतच सैन्यदलातील अधिकाऱ्यांनीही ‘फत्तेशिकस्त’चं कौतुक केलं होतं. हा सिनेमा त्यांना इतका भावला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं दर्शन घडवणारा ‘फत्तेशिकस्त’ आपल्या अर्काइव्हमध्ये असावा, असा निर्णय ‘मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट’ने घेतला आहे.

‘मराठा लाईट इन्फंट्री’ हे भारतीय सेनेतील सैन्य दलातील सर्वात जुनं सैन्यदल आहे. 1768 मध्ये स्थापन झालेल्या या सैन्यदलाची ओळख सुरुवातीला ‘ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण’ अशी होती. 1802 च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

लाईट इन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करणारी पलटण. बेळगावमध्ये असलेल्या या ‘मराठा लाईट इन्फंट्री’च्या प्रशिक्षण केंद्रातील अर्काइव्हमध्ये ‘फत्तेशिकस्त’चा समावेश करण्यात येण्यामागे एक विशेष कारण आहे.

‘फत्तेशिकस्त’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, गनिमी कावे, युद्धापूर्वीची शिस्तबद्ध तयारी, शत्रूची इत्तंभूत माहिती मिळवून त्याला कोंडीत पकडण्याची कला आणि सहकाऱ्यांच्या मदतीने गनिमावर विजय संपादन करण्याचा ध्यास या गोष्टींचं अत्यंत  बारकाव्यानिशी सादरीकरण करण्यात आलेलं आहे.

‘मराठा लाईट इन्फंट्री’मध्ये सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक जवानाला छत्रपती शिवरायांची युद्धनीती प्रेरणा देणारी ठरणारी आहे. आजही जगभरातील बलाढ्य राष्ट्र ज्यांची नीती युद्धात वापरत आहेत, त्या शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास मराठा बटालियनमधील सैनिकांना व्हावा, या हेतूने ‘मराठा लाईट इन्फंट्री’च्या अर्काइव्हमध्ये ‘फत्तेशिकस्त’ (Fatteshikast Maratha Light Infantry) समाविष्ट करण्यात येणार आहे.

हेही वाचा – चित्रपट पाहताना लालकृष्ण आडवाणींना अश्रू अनावर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

लौकीक आणि अलौकीक पातळीवर यशस्वी झालेला, दिग्गज दिग्दर्शकांनी नावाजलेला, तिकीटबारीवर यश संपादन केलेला हा सिनेमा बेळगावच्या द ‘मराठा लाईट इन्फंट्री’ रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर गोविंद कलवाड, डेप्युटी कमांडंट कर्नल पी. एल. जयराम, बेळगावचे समशेर बहाद्दूर हरोलीकर सरकार श्रीमान रमेश केशवराव रायजादे, सेनाखासखेल सत्यशीलराजे दाभाडे यांच्या प्रयत्नांमुळे ‘मराठा लाईफ इन्फंट्री’मध्ये समाविष्ट होणार आहे.

अजय आरेकर-अनिरुद्ध आरेकर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके, हिंदीतील अनुप सोनी या मातब्बर कलाकारांची साथ लाभली आहे. (Fatteshikast Maratha Light Infantry)

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.