कंगना रनौतच्या ‘त्या’ ट्विटविरोधात तक्रार दाखल, अडचणी वाढण्याची शक्यता!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारावर अभिनेत्री कंगना रनौतने टीका केली होती.

कंगना रनौतच्या 'त्या' ट्विटविरोधात तक्रार दाखल, अडचणी वाढण्याची शक्यता!

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारावर अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) टीका केली होती. आंदोलक शेतकऱ्यांना जेलमझध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा असे ही कंगना म्हणाली होती. कंगना फक्त ऐवढेच म्हणून थांबली नव्हती तर एका ट्विटमध्ये कंगना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी देखील म्हणाली होती. तिच्या याच ट्विटविरोधात आता तक्रार देण्यात आली आहे. यामुळे कंगनाच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (Filed a complaint against Kangana Ranaut’s tweet)

कंगनाने हे गायिका रिहानाच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले होते, “कोणीही त्यांच्याबद्दल बोलत नाही त्याचे कारण म्हणजे ते शेतकरी नसून देश तोडणारे आतंकवादी आहेत. जेणेकरून चीनला आमच्या देशावर ताबा मिळवता येईल. गप्प बसला मुर्खांनो… अशाप्रकारे ट्विट कंगनाने केले होते. कंगनाच्या याच ट्विटविरोधात बेळगाव येथील वकिलाने कंगनाच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांझ याने ‘कोणी इतकेही आंधळे असू नये’, अशी टिप्पणी केली होती. त्यावर कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे अद्वातद्वा बोलत दिलजित दोसांझवर टीका केली होती.

तिने दिलजितला करण जोहरचा ‘पाळीव कुत्रा’ म्हटले होते. तू रोज ज्यांची चाटून काम मिळवतोस मी त्यांची रोज वाजवते. त्यामुळे जास्त उडू नकोस. मी कंगना रानौत आहे, तुझ्यासारखी चमची नाही, अशा अत्यंत खालच्या भाषेत कंगनाने दिलजितवर टीका केली होती.

संबंधित बातम्या : 

दिलजितने पुन्हा घेतला कंगनासोबत ‘पंगा’, म्हणाला…

Sunny Leone | लाखोंचा अ‍ॅडव्हान्स घेऊन इव्हेंटला दांडी, सनी लिओनी म्हणते चिखलफेक थांबवा

Video | रोमँटिक अंदाजात अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेन्डला प्रपोज, पाहा व्हिडीओ

(Filed a complaint against Kangana Ranaut’s tweet)

Published On - 12:17 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI