AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 | ’10 व्या’ दिवशीही करणार सनी देओलचा गदर 2 धमाका, बॉक्स ऑफिसवर होऊ शकते तब्बल इतक्या कोटींची कमाई

सनी देओल याच्या गदर 2 चित्रपटाला रिलीज होऊन आज 10 दिवस झाले आहेत. विशेष म्हणजे ओपनिंग डेपासूनच हा चित्रपच धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.

Gadar 2 | '10 व्या' दिवशीही करणार सनी देओलचा गदर 2 धमाका, बॉक्स ऑफिसवर होऊ शकते तब्बल इतक्या कोटींची कमाई
| Updated on: Aug 20, 2023 | 4:58 PM
Share

मुंबई : सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने तूफान अशी कमाई करण्यास सुरूवात केलीये. गदर 2 चित्रपटाचे ओपनिंग अत्यंत धमाकेदार ठरले आणि चित्रपटाने (Movie) अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतरही तशीच जादू या चित्रपटाची प्रेक्षकांवर बघायला मिळत आहे. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळाले आहे. गदर 2 चित्रपटाने धमाकेदार कमाई करण्यास सुरूवात केलीये.

गदर 2 चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल हे मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे सनी देओल आणि अमीषा पटेल हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले. नुकताच चित्रपटाने फक्त आठ दिवसांमध्ये तब्बल 300 कोटींचे कलेक्शन पार करत मोठा इतिहास रचला आहे. यंदाच्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील गदर 2 असू शकतो.

गदर 2 चित्रपटाला आज रिलीज होऊन 10 दिवस होत आहेत. विशेष म्हणजे आज चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. रविवार असल्याने थिएटरमध्ये मोठी गर्दी बघायला मिळत आहे. अनेक रिपोर्टच्या मते आज गदर 2 हा चित्रपट 40 कोटींच्या जवळपास कमाई करेल. जर हे खरे झाले तर बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ होणार हे नक्की.

9 व्या दिवशी देखील चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कमाई केलीये. आतापर्यंत गदर 2 चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर एकून 376 ची कमाई केलीये. जर आज 40 कोटींच्या आसपास कलेक्शन करण्यात यश मिळाले तर मोठा धमाका होत थेट गदर 2 हा चित्रपट 400 कोटींच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये सहभागी होऊ शकतो.

गदर 2 चित्रपटाची कमाई बघता हा चित्रपट शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडेल असे सांगितले जात आहे. शाहरूख खान याचा पठाण हाच चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा यंदाचा बाॅलिवूड चित्रपट आहे. विशेष म्हणजे असे सांगितले जात आहे की, पुढील काही दिवसांमध्ये गदर 2 चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ ही होऊ शकते.

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.