‘गदर 2’ने ‘जवान’पेक्षा अधिक पैसे कमावले? जाणून घ्या शाहरुख-सनी देओलच्या चित्रपटांमागील खरं गणित

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिल्या भागाप्रमाणेच सीक्वेलवरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. दिल्ली असो किंवा मुंबई.. प्रत्येक राज्याच्या प्रेक्षकांना तारा सिंगची भूमिका आवडली. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 524.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

'गदर 2'ने 'जवान'पेक्षा अधिक पैसे कमावले? जाणून घ्या शाहरुख-सनी देओलच्या चित्रपटांमागील खरं गणित
Gadar 2 and JawanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 3:14 PM

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाचा शाहरुख खानच्या ‘जवान’पेक्षा जास्त फायदा झाला, हे ऐकून थोडंसं अजब नक्कीच वाटू शकतं. मात्र हेच सत्य आहे. शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मात्र प्रॉफिट मार्जिनबद्दल बोलायचं झालं तर सनी देओलचा ‘गदर 2’ त्यावर भारी पडेल. या दोन्ही चित्रपटांचा बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन याच्या माध्यमातून ही गोष्ट समजता येईल. कारण बजेटमधील फरक हाच प्रॉफिटमधील फरक स्पष्ट करू शकतो. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचं नेमकं गणित काय ते जाणून घेऊयात..

चित्रपटांचा बजेट

11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ने आत्तापर्यंत भारतात 525 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ‘जवान’ने भारतात 613 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र जेव्हा बजेटचा प्रश्न येतो तेव्हा ‘गदर 2’ हा फक्त 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. तर शाहरुखचा ‘जवान’ या चित्रपटाचा बजेट तब्बल 300 कोटी रुपये इतका आहे. ‘जवान’ आणि ‘गदर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या बजेटच्या आकड्यावरून हे स्पष्ट समजू शकतो की या दोन्ही चित्रपटांपैकी कोणाला सर्वात जास्त यश मिळालं.

कमाई

‘गदर 2’ने त्याच्या बजेटपेक्षा सात पटीने जास्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर स्वतःला ब्लॉकबस्टर ठरवलं आहे. तर 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘जवान’ने भारतात आत्तापर्यंत केवळ दुप्पटच कमाई केली आहे. मात्र जगभरात शाहरुख खानच्या चित्रपटाने 1100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

हे सुद्धा वाचा

सनी देओलचा ‘गदर 2’ हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. तब्बल 22 वर्षांनंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अमिषा पटेल आणि सनी देओलची हीट जोडी मोठ्या पडदावर एकत्र आली. तर दुसरीकडे ‘पठाण’ या चित्रपटानंतर शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला आहे. जगभरात 1100 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटात शाहरुखसोबतच दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...