कोळंबी विकत घेताना मासे विक्रेत्या महिलेसोबत गप्पा मारल्या,चहा घेतला; अभिनेत्रीचा साधेपणा चाहत्यांना खूपच भावला

अभिनेत्री गायत्री दातारची मासे विक्रेत्या मालनताई यांच्याशी चांगलीच मैत्री झाली आणि त्यांच्यासोबत तिने गप्पा मारत चहाचा आस्वादही घेतला. हा व्हिडीओ तिने आवर्जून शेअरही केला आहे.

कोळंबी विकत घेताना मासे विक्रेत्या महिलेसोबत गप्पा मारल्या,चहा घेतला; अभिनेत्रीचा साधेपणा चाहत्यांना खूपच भावला
gayatri datar
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 7:07 PM

मालिकांमधील कलाकार सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात, आवडत्या मालिकांमधील लाडक्या कलाकारांना दररोज भेटत असतात. पण जेव्हा प्रत्यक्षात त्या कलाकरांशी भेट होते तेव्हा त्यांचा आनंद हा खरा पाहण्यसारखा असतो. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटणं ही प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. अभिनेत्री गायत्री दातार हीनेसुद्धा असाच काहीसा सुखद अनुभव घेतला.. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’या मालिकेमुळे गायत्रीला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. आजही या मालिकेतील ईशा याच नावाने तिला अनेकजण ओळखतात. अशी ही लोकप्रिय अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. गायत्रीने तिचा हा फॅन मोमेंट व्हिडीओद्वारे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला आहे.

मासे विक्रेत्या महिलेने म्हंटला गायत्रीचा डायलॉग

गायत्री शूटिंगवरुन घरी जातं असताना मासे घ्यायला बाजारात गेली. तिथल्या मासे विक्रेत्या महिलेने तिला ओळखलं. ही माहिला गायत्रीची चाहती आहे. तसंच या महिलेने ‘तुला पाहते रे’ मालिकेतील लोकप्रिय डायलॉगही म्हणून दाखवला. गायत्रीने या महिलेबरोबरचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

पुढे गायत्रीने या महिलेबरोबर संवादही साधला. या संवादात त्या महिलेने गायत्रीला त्यांना नातू झाल्याचेही सांगितलं. एवढचं नाही तर तिने या महिलेसोबत चहाचा आस्वादही घेतला. त्यांच्या या गोड संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून गायत्रीच्या चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

मासेविक्रेत्या मालनताईने केला चहाचा आग्रह

हा व्हिडीओ शेअर करत गायत्रीने म्हटलं आहे की, “शूटिंग संपवून परत जाताना कोळंबी घ्यायला थांबले. तिथे या गोड मालनताईंशी ओळख झाली. गायत्री नाही तर ईशा या नावाने त्यांनी मला ओळखलं असा त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी ‘दो रुपये भी बहुत बडी चीज होती है’ हा आवडता संवाद सुध्दा म्हणून दाखवला. मग त्यांनी चहा पिण्याचा आग्रह केला. कोळंबी साफ करत त्यांनी गप्पा मारल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना त्या माझ्याविषयी सांगत होत्या”.

गायत्रीने पुढे म्हटलं आहे की, “मालन ताईंसारखे माझ्यावर, मी साकारलेल्या पात्रांवर प्रेम करणारी माणसे कायम भेटत असतात. आज वाटलं, या निमित्ताने तुम्हा सगळ्यांचे मला इतकं प्रेम दिल्याबद्दल मनापासुन आभार मानावेत. कधी ईशा, कधी शुभ्रा, कधी बिग बॉस, कधी चला हवा येउ द्या… अशा वेगवेगळ्या कामांवर प्रेम करणारी माणसं मला लाभल्यामुळे मी भाग्यवान असल्याची जाणीव सतत जाणवत असते. तुमचं प्रेम असंच कायम माझ्या पाठीशी राहुदे”.

गायत्रीने साकारली पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका सध्या गायत्रीबद्दल सांगायचे झाले तर कलर्स मराठीवर नव्याने सुरू झालेल्या ‘अबीर गुलाल’ या मालिकेतून पुनरागमन केलं आहे. तिच्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच गायत्रीने नकारात्मक भूमिका साकारल्याचे पाहायला मिळत आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.