मालिकाप्रेमींसाठी नवी भेट; ‘घरोघरी मातीच्या चुली’च्या प्रोमोने वाढवली उत्सुकता

येत्या 18 मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून कथेविषयी कमालीची उत्सुकता होती. आता नुकतंच पुण्यातील ढेपेवाड्यात कलाकारांची पत्रकार परिषद पार पडली.

मालिकाप्रेमींसाठी नवी भेट; 'घरोघरी मातीच्या चुली'च्या प्रोमोने वाढवली उत्सुकता
पुण्याच्या ढेपे वाड्यामध्ये पार पडली मालिकेची पत्रकार परिषद Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 3:26 PM

मुंबई : 13 मार्च 2024 | कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली.

कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मालिकेची पत्रकार परिषद नुकतीच पुण्याच्या ढेपे वाड्यात पार पडली. वाडा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, वाडा म्हणजे पिढ्यानपिढ्या एकत्र नांदणारी वास्तू, वाडा जिथे सणवार ‘एकट्याने नाही तर ‘एकत्र’ साजरे होतात, वाडा जिथे घराचं गोकुळ होतं. रणदिवे कुटुंब म्हणचे गोकुळच. म्हणूनच या कुटुंबासोबतची खास भेट ढेपे वाड्यात करण्यात आली. या खास क्षणी हृषिकेश-जानकीच्या लग्नाचा दहावा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

या प्रसंगी स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे, निर्माते सुचित्रा बांदेकर, आदेश बांदेकर आणि सोहम बांदेकर तसेच सविता प्रभुणे, नयना आपटे, रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, प्रतीक्षा मुणगेकर, आशुतोष पत्की, अक्षय वाघमारे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, गीता निखाग्रे, बालकलाकार आरोही सांबरे आणि दिग्दर्शक राहुल लिंगायत उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, “स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच नातेसंबंधांबद्दल भाष्य करणाऱ्या मालिका सादर करत असते. रसिकांच्या अवती भवती होणाऱ्या गोष्टी मालिकेत दिसल्या की त्या आपल्याशा वाटतात. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आपल्या सगळ्यांना माहित आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात. कुटुंब म्हटलं की माणसं आली, भांड्याला भांडं लागणारच. पण म्हणून कोणी आपल्या माणसांना अंतर देत नाही. प्रत्येकाला सांभाळून आपण पुढे जातो. जो हिंमत ठेवतो, ज्याला माणसं जोडून ठेवता येतात तो जिंकतो. ही मालिका सुद्धा अशीच आहे नात्यांवर भाष्य करणारी. कोणत्याही परिस्थितीत दोष व्यक्तींचा नाही तर परिस्थितीचा असतो असं समजून घर टिकवणारी. तोडणं फार सोपं असतं, कठीण असतं ते जोडून ठेवणं.”

घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र अभिनेत्री रेश्मा शिंदे साकारणार आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली, “रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती. स्टार प्रवाहने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन जानकी साकारण्याची संधी दिली आहे. जानकी अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांनां समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले. सध्या करिअरच्या निमित्ताने म्हणा, किंवा स्वेच्छेने म्हणा विभक्त कुटुंब पहायला मिळतात. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगात हीच नाती आपली सोबत पुरवतात. म्हणूनच नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली.”

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतल्या हृषिकेश या पात्राविषयी सांगताना सुमीत पुसावळे म्हणाला, “स्टार प्रवाह कुटुंबाचा सदस्य होतोय याचा मनापासून आनंद आहे. मी याआधी साकारलेल्या भूमिकेतून बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय. ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकेनंतर कौटुंबिक मालिकेत काम करण्याचा अनुभव घेतोय. त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल उत्सुक आहे. या मालिकेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा आहे. मला असं वाटतं एकत्र कुटुंब ही रणदिवे कुटुंबाती खरी ताकद आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, की एक लाकडाची काठी तोडणं सोपं आहे मात्र लाकडाची मोळी तोडणं तितकंच अवघड. त्यामुळे कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे.” ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका येत्या 18 मार्चपासून सायंकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.