AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात पडला प्रसिद्ध अभिनेता; चार वर्षांनंतर ‘या’ कारणामुळे झाला ब्रेकअप

हर्षद आणि अपर्णा यांच्या रिलेशनशिपविषयी मालिकेच्या सेटवर सर्वांनाच ठाऊक होतं. सेटवर दोघं एकत्र यायचे आणि शूटिंग संपल्यानंतरही एकत्र जायचे. इतकंच नव्हे तर अपर्णाचे सीन्स पूर्ण होईपर्यंत अनेकदा हर्षद सेटवर तिच्यासाठी थांबायचा.

ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात पडला प्रसिद्ध अभिनेता; चार वर्षांनंतर 'या' कारणामुळे झाला ब्रेकअप
Harshad Arora and Aparna KumarImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2023 | 1:33 PM
Share

मुंबई : स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका टीआरपीच्या यादीत नेहमीच टॉप 5 मध्ये असते. या मालिकेत नुकतीच अभिनेता हर्षद अरोराची एण्ट्री झाली आहे. त्यामुळे कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेतील एण्ट्रीसोबतच हर्षद त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हर्षदने गर्लफ्रेंड अपर्णा कुमारशी ब्रेकअप केलं. अपर्णा हीसुद्धा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मे 2022 मध्ये या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हर्षदने त्याच्या ब्रेकअपमागील कारण सांगितलं आहे. हर्षद आणि अपर्णा हे 2018 मध्ये ‘मायावी मालिंग’ या मालिकेत एकत्र झळकले होते. विशेष म्हणजे या मालिकेत अपर्णाने हर्षदच्या आईची भूमिका साकारली होती.

ब्रेकअपबद्दल काय म्हणाला हर्षद?

“कधीकधी नाती कायम टिकत नाहीत. सध्या मला फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. रिलेशनशिपसाठी खूप मेहनत आणि गुंतवणुकीची (भावनिक) गरज असते आणि मी सध्या माझ्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे मी इतर कशाचाही विचार करू शकत नाही. जेव्हा तुमच्या नात्यात बरेच मतभेद निर्माण होतात आणि तुम्हाला वाटतं की काही गोष्टी एकाच दिशेने जात नाहीत. तेव्हा वेगळं होणं आणि आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जाणंच चांगलं असतं. अपर्णा आणि मी जोपर्यंत रिलेशनशिपमध्ये होतो, तोपर्यंत आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला. मात्र हे नातं कायमचं नव्हतं. त्यामुळे आमच्या आयुष्यात आणखी समस्या निर्माण करण्यापेक्षा आम्ही परस्पर संमतीने ब्रेकअपचा निर्णय घेतला”, असं हर्षदने सांगितलं.

एका मुलाखतीत अपर्णा कुमारसुद्धा या ब्रेकअपविषयी व्यक्त झाली होती. “चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मला वाटतं की आमच्या ब्रेकअपबद्दल बोलण्यापेक्षा सन्मानाने पुढे जाणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी त्याबद्दल गप्प राहिले आणि यापुढेही तसंच राहण्याचा विचार आहे. कोणालाही त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं आवडत नाही आणि मला वाटतं की भूतकाळाबद्दल बोलण्यापेक्षा पुढे जाणं कधीही चांगलं आहे”, असं ती म्हणाली होती.

हर्षद आणि अपर्णा यांच्या रिलेशनशिपविषयी मालिकेच्या सेटवर सर्वांनाच ठाऊक होतं. सेटवर दोघं एकत्र यायचे आणि शूटिंग संपल्यानंतरही एकत्र जायचे. इतकंच नव्हे तर अपर्णाचे सीन्स पूर्ण होईपर्यंत अनेकदा हर्षद सेटवर तिच्यासाठी थांबायचा. त्यामुळे या दोघांचं नातं अनेकांना माहीत होतं.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.