सिनेविश्वाची ‘ग्लॅमर गुडीया’, तब्बल 9 महिने घरात सडत होता अभिनेत्रीचा मृतदेह, शरीराचा झालेला सांगाडा
झगमगत्या विश्वात अभिनेत्री यशाच्या शिखरावर असताना ह्दयद्रावक निधन झालं. तब्बल 9 महिने अभिनेत्रीचा मृतदेह घरात सडत होता... संपूर्ण शरीराचा झालेला सांगाडा... तिच्या आयुष्यातील शेवटचे दिवस होते सर्वात कठीण

झगमगत्या विश्वात अभिनेत्री कायम त्यांच्या ग्लॅमरस आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण काही अभिनेत्री एका रात्रीत गायब झाल्या त्यानंतर कधी लाईमलाईटमध्ये आल्याच नाहीत. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं. तब्बल 9 महिने झालेले… अभिनेत्री घराचं भाडं दिलं नव्हतं… घर मालक सतत अभिनेत्रीशी भाड्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. पण कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्रासलेल्या घर मालकाना कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि अभिनेत्रीला घरातून काढण्यासाठी आणि भाडं वसूल करण्यासाठी पोलिसांना घेऊन दारात उभा राहिला. पण जेव्हा पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा समोर काही भयानक परिस्थिती होता.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे तिने मॉडेलींग पासून अभिनय विश्वात देखील स्वतःचं नाव मोठं केलं होतं. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अभिनेत्री यशाच्या शिखरावर चढली पण तिचा अंत फार वाईट होता. अभिनेत्रीचा मृतदेह बंद घरात आढळला. ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ माजली होती…
टीव्ही विश्वातील होती अव्वल अभिनेत्री…
अभिनेत्रीचं नाव आहे हुमैरा असगर (Humaira Asghar)… गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्री हुमैरा असगर हिचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत भेटला… हुमैरा एका लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘बेनाम’, ‘तमाशा’, ‘गुरू’, ‘एहसान फरामोश थे’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं.
अभिनेत्रीचं शेवटचं फोटोशूट
सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये देखील हुमैरा हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. निधनाच्या एका महिन्यापूर्वी तिने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरून ती कायमची गायब झाली. तिची शेवटची पोस्ट 30 सप्टेंबर 2024 मधील होती.
कसा भेटला मृतदेह?
ऑक्टोबर महिन्यात हुमैरा हिच्याबद्दल कोणताच पत्ता लागत नव्हता… पण तेव्हाच तिच्या घरात मृतदेह आढळला… जेव्हा घर मालकाने थकलेल्या भाड्यासाठी कोर्टाची मदत घेतली, तेव्हा अभिनेत्रीच्या निधनाबद्दल सर्वांना कळलं. घर मालक पोलिसांसोबत अभिनेत्रीच्या घरी पोहोचला तेव्हा समोर थक्क करणारं दृष्य होतं. अभिनेत्रीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत भेटला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची बाल्कनी, खिडक्या आणि दरवाजे बंद होतं…
9 महिन्यांपूर्वी झालेलं अभिनेत्रीचं निधन
पोस्टमार्टमनंतर ऑटोप्सी रिपोर्टच्या माध्यमातून कळलं की, अभिनेत्री शारीराचा फक्त सांगाडा शिल्लक होता… कॉल डिटेल रेकॉर्ड्स, सोशल मीडियावरील शेवटटी पोस्ट, खराब झालेले खाद्यपदार्थ आणि मृतदेहाची झालेली दुर्दशा यांमुळे असा विश्वास निर्माण झाला की, त्या अभिनेत्रीचा मृत्यू ऑक्टोबर 2024 मध्ये झाला होता. तिच्या वाढदिवसाच्या अवघ्या तीन दिवस आधी, ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या तिच्या मृत्यूच्या आधी, तिने 14 लोकांशी संवाद साधला होता. तिच्या घरी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे, तिचा मृत्यू नऊ महिने आधीच झाला असावा असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
