रिंकू राजगुरुच्या चाहत्यांसाठी Good News, ‘या’ हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

सोशल मीडियावरसुद्धा रिंकू सक्रिय असून ती नेहमीच चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत असते. पण ती सध्या काय करतेय? असा प्रश्न तिच्या सगळ्याच चाहत्यांना पडला असणार.

रिंकू राजगुरुच्या चाहत्यांसाठी Good News, 'या' हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अभिनेत्री रिंकू राजगुरुने सैराट सिनेमातून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. तिच्या अभिनयाने ती रातोरात स्टार झाली. महाराष्ट्रात तर सैराट सिनेमानंतर आर्चीती एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. सैराट सिनेमामुळे तिला राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आलं. खंरतर, सैराटच्या भरघोस यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सोशल मीडियावरसुद्धा रिंकू सक्रिय असून ती नेहमीच चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत असते. पण ती सध्या काय करतेय? असा प्रश्न तिच्या सगळ्याच चाहत्यांना पडला असणार. (Good news for Rinku fans performing Hindi movie Unpaused On Prime)

रिंकू राजगुरु तिच्या हंड्रेड या हिंदी वेबसीरिजनंतर अॅमेझॉन प्राइमवरील ‘अनपॉज्ड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रिंकूचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहता येणार आहे. गुरुवारी अ‍ॅमेझॉन प्राइमने ‘अनपोज्ड’ या पाच शॉर्ट फिल्मचा टीझर रिलीज केला. यामध्ये ‘द फॅमिली मॅन’ फेम राज एंड डीके यांनी एक शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे. ज्यामध्ये गुलशन देवैया आणि सैयामी खेर हेदेखील आहेत. या शॉर्ट फिल्मचं शूटिंग अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत करण्यात आलं आहे.

अनपॉज्ड या चित्रपटामध्ये पाच लघुपट एकत्र चित्रित करण्यात आले आहेत. ज्यातील एकामध्ये रिंकूनेही काम केलं आहे. 18 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Good news for Rinku fans performing Hindi movie Unpaused On Prime)

यामध्ये ग्लिच, अपार्टमेंट, रॅट-ए-टॅट, विषाणू, चांद मुबारक या सिनेमांचा समावेश आहे. यातील रॅट-ए-टॅट या चित्रपटातून रिंकू राजगुरु चाहत्यांना नव्या अंदाजात दिसणार आहे.

इतर बातम्या – 

Photo : अग्ग बाई! हातात चुडा, नाकात नथ; रिंकू राजगुरुचा खास मराठमोळा लूक

अभिनेत्री रिंकू राजगुरुसह ‘कागर’च्या टीमशी मनमोकळ्या गप्पा

(Good news for Rinku fans performing Hindi movie Unpaused On Prime)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI