AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“काही बरंवाईट झालं असतं तर..”; माधुरीसोबतच्या बलात्काराच्या सीनबद्दल गोविंद नामदेव यांचा खुलासा

'प्रेम ग्रंथ' या चित्रपटातील माधुरी दीक्षितसोबतच्या एका मोठ्या सीनबद्दल अभिनेते गोविंद नामदेव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाले. लैंगिक शोषणाचा हा सीन होता आणि सेटवर त्यावेळी कसं वातावरण होतं, याविषयी त्यांनी सांगितलं.

काही बरंवाईट झालं असतं तर..; माधुरीसोबतच्या बलात्काराच्या सीनबद्दल गोविंद नामदेव यांचा खुलासा
Govind Namdev and Madhuri DixitImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2025 | 8:49 AM
Share

राजीव कपूर दिग्दर्शित ‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेते ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका होत्या. थॉमस हार्डी यांच्या ‘टेस ऑफ द डर्बनविलेस’ या इंग्रजी कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटातील एका सीनमुळे हा चित्रपट त्यावेळी खूप चर्चेत आला होता. माधुरीवरील लैंगिक शोषणाचा हा सीन होता. अभिनेते गोविंद नामदेव आणि माधुरी यांच्यात हा सीन चित्रित करण्यात आला होता. आता बऱ्याच वर्षांनंतर गोविंद नामदेव हे त्या सीनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की, माधुरीसोबत तो सीन शूट करताना ते खूप घाबरले होते.

‘हिंदी रश’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गोविंद नामदेव यांना माधुरीसोबतच्या या सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “याबाबतीत मी माधुरीचा चाहता झालो होतो. आधीच दबावाखाली असलेल्या एखाद्या कलाकाराला जेव्हा इतक्या मोठ्या कलाकाराकडून कामात सहकार्य मिळतं, तेव्हा दोघं पडद्यावर 100 टक्के चांगली कामगिरी करू शकतात. सहसा असं होताना दिसत नाही. मात्र माधुरीच्या व्यक्तीमत्त्वाचं वलयच खूप वेगळं आहे. तिने सुरुवातीपासूनच खूप सहकार्य केलं.”

“तिच्या वागण्या-बोलण्यामुळे मी कम्फर्टेबल होऊ शकलो. आम्ही सर्वांत शेवटी तो सीन शूट केला होता. मी हात जोडून माधुरीला म्हणालो, ‘मी हा सीन करायला जातोय.’ त्यावर ती मला ‘हो, ठीक आहे’ असं म्हणायची. मी घाबरत होतो कारण काही बरंवाईट होऊ नये. नंबर वन हिरोइनसोबत इतका मोठा सीन शूट करताना काही चूक होऊ नये म्हणून मी चिंतेत होतो. कारण त्यामुळे सहकलाकार म्हणून आमचं नातं कायमचंच बिघडू शकतं”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

गोविंद नामदेव हे बॉलिवूडमध्ये त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठीच ओळखले जातात. त्यांनी डेविड धवन यांच्या ‘शोला और शबनम’ या चित्रपटातून 1992 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘सरफरोश’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘दम मारो दम’, ‘सत्या’, ‘ओएमजी- ओह माय गॉड’, ‘ओएमजी 2’, ‘सॅम बहादूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.