AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ansh : निर्मात्यांना प्रेमानंद महाराजांकडून मिळालेली मोठी वॉर्निंग, कसली होती भीती?

Hanuman Ansh: 'हनुमान अंश' या सिनेमाने फक्त 2 कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये 50 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. निर्मात्या अनुप्रिया नगर यांनी प्रेमानंद महाराज यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन हा सिनेमा साकारला होता. तर काय म्हणले महाराज जाणून घ्या...

Hanuman Ansh : निर्मात्यांना प्रेमानंद महाराजांकडून मिळालेली मोठी वॉर्निंग, कसली होती भीती?
Hanuman Ansh
| Updated on: Sep 02, 2026 | 1:07 PM
Share

Hanuman Ansh : नीम करोली बाबा यांच्या जिवनावर आधारित ‘हनुमान अंश’ सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. फक्त 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने 50 कोटींची कमाई केली आहे. पण सिनेमा तयार करण्यापूर्वी अनुप्रिया नागर यांनी प्रेमानंद महाराज यांचा आशीर्वाद घेतला. एवढंच नाही तर, तर त्यांनी प्रेमानंद महाराज यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्यानुसार सिनेमा तयार केला. शिवाय त्यांनी प्रेमानंद महाराज यांना फिल्म बनवण्यासंदर्भात प्रश्न देखील विचारलेला.

निर्मात्यांनी प्रेमानंद महाराजांना एक प्रश्न विचारला, ‘धर्मिगावर चालून सिनेमा तयार करणं ही सुद्धा एक सेवा आहे का?’ यावर महाराज होकार देत म्हणाले, ‘एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, महापुरुषांचं अनुकरण करणं फार कठीण असते… त्यात सांसारिकतेचा लवलेशही शिरू देऊ नये; एखाद्या महान आत्म्याचं जीवन पाहिल्याने आपल्यामध्ये वैराग्य, भक्ती आणि विवेक, या तिन्ही गोष्टींची प्रेरणा मिळायला हवी. अशा महान व्यक्तीच्या सादरीकरणात, मग ते सीन असोत किंवा अभिनय, अशी कोणतीही गोष्ट नसावी जी आक्षेपार्ह किंवा अयोग्य वाटू शकेल.’

‘जसं की नीम करोली बाब एक भगवान प्राप्त महापुरुष आहे.. अशा पुरुषांचं अनुकरण केलं जाऊ शकत नाही, कराण ती स्थिती नाही… एखाद्या महान व्यक्तीच्या बाह्य वैशिष्ट्यांचं अनुकरण करताना, केवळ प्रेक्षकांची पसंती मिळवण्यासाठी त्यात अनावश्यक गोष्टींची भर घालणं टाळलं पाहिजं. त्या महान व्यक्तीच्या मुख्य व्यक्तिमत्त्वाला बाधा आणेल किंवा त्यांच्या प्रतिमेशी विसंगत ठरेल असं काहीही करणं टाळलं पाहिजे. अन्यथा, ती आपल्याकडून झालेली एक चूक किंवा उल्लंघन ठरू शकते.

म्हणूनच, याबाबतीत सावधगिरी बाळगा. लोक तो सिनेमा पाहतील किंवा नाही याचा विचार न करता, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही जे काही वाचले किंवा ऐकले आहेत, त्यानुसारच त्यांचं चित्रण करा; कोणतीही पडताळणी न झालेली किंवा पुराव्याविना असलेली माहिती सादर करू नका. असं देखील प्रेमानंद महाराज म्हणाले.

सांगायचं झालं तर, ‘हनुमान अंश’ सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रेमानंद महाराजांनी सांगितलेली प्रत्येक गोष्य गांभीर्याने घेतली. याच कारणामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने 25 दिवसांमध्ये 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Follow Us
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा परवाना निलंबित
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
Gold And Silver Rate Hike | पंतप्रधान मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण! सोनं तब्बल ₹4,950 तर चांदी ₹8,000 ने घसरली
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल