Happy Birthday Amit Sadh | अभिनयाच्या वेडापायी शिक्षण सोडलं, मालिका विश्व ते बॉलिवूड गाजवतोय अमित साध!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 05, 2021 | 11:34 AM

5 जून रोजी जन्मलेल्या अमितने छोट्या पडद्यापासून, टेलिव्हिजन मालिका आणि वेब विश्वावर देखील छाप सोडली आहे. अमित नेहमीच वादापासून दूर राहणे पसंत करतो. अभिनयाच्या वेडापायी अमितने बारावीतच शिक्षण सोडले आणि पुढे मनोरंजन विश्वातच त्याने करिअर केले.

Happy Birthday Amit Sadh | अभिनयाच्या वेडापायी शिक्षण सोडलं, मालिका विश्व ते बॉलिवूड गाजवतोय अमित साध!
अमित साध

Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता अमित साध (Amit Sadh) याला कोण ओळखत नाही. अमित सध्या सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. अतिशय खडतर संघर्षानंतर अमित साध आज यशाच्या शिखरावर पोहचला आहे की, त्याला आणखी कोणत्याही परिचयाची गरज नाही. ‘काई पो छे’, ‘सुलतान’ आणि ‘गोल्ड’ अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या अमित साध याचा आज (5 जून) वाढदिवस आहे (Happy Birthday Amit Sadh know about actors career journey).

5 जून रोजी जन्मलेल्या अमितने छोट्या पडद्यापासून, टेलिव्हिजन मालिका आणि वेब विश्वावर देखील छाप सोडली आहे. अमित नेहमीच वादापासून दूर राहणे पसंत करतो. अभिनयाच्या वेडापायी अमितने बारावीतच शिक्षण सोडले आणि पुढे मनोरंजन विश्वातच त्याने करिअर केले. छोट्या पडद्यावर नीना गुप्ता निर्मित ‘क्यूं होता है प्यार’ या मालिकेत अमितने आदित्यची भूमिका साकारली होती.

छोट्या पडद्याचा प्रसिद्ध चेहरा!

View this post on Instagram

A post shared by AMIT SADH (@theamitsadh)

पहिल्या शोमधून अफाट यश मिळवल्यानंतर अभिनेत्याने बर्‍याच टीव्ही शोमध्ये काम केले. ‘बिग बॉस 1’मध्ये अमित एक स्पर्धक म्हणून दिसला आहे, हे त्याच्या चाहत्यांना आता फारसे आठवत देखील नाही. या शोमध्ये अमितला खूप प्रसिद्धी मिळाली होती. तथापि, अमित फार काळ या स्पर्धेत टिकू शकला नाही.

पंजाबी अभिनेत्रीशी लिंकअपची चर्चा!

अमित ‘नच बलिये’ आणि ‘फियर फॅक्टर’ सारख्या बर्‍याच शोमध्ये दिसला आहे. असं म्हणतात की ‘गन्स अँड रोज्स’ च्या दरम्यान अमित साध आणि पंजाबी अभिनेत्री नीरू बाजवा यांच्या लिंकअपच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. इतकेच नाही तर, या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. तथापि 2010मध्ये दोघेही विभक्त झाल्याची बातमी समोर आली होती (Happy Birthday Amit Sadh know about actors career journey).

बॉलिवूडमध्ये एंट्री

2010मध्ये अभिनेताने ‘फूंक २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु, या चित्रपटातून अभिनेत्याच्या कारकिर्दीला फारसे यश मिळालेले नाही. 2013 मध्ये आलेल्या ‘का पो छे’ या चित्रपटातून या अभिनेत्याला खरी ओळख मिळाली आणि त्यानंतर तो एकामागून एक चित्रपटांमध्ये दिसू लागला. आता अभिनेता ‘ब्रीथ’, ‘जीत की जिद’, ‘अवरोध’ अशा वेबसीरीजमध्ये झळकला आहे. अमित साध ओटीटीचा एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. प्रत्येक निर्मात्याला अमितला आपल्या प्रोजेक्टमध्ये असावा असे वाटते.

आत्महत्या करण्याचा विचार

Men’s XPला दिलेल्या मुलाखतीत अमित साधने सांगितले होते की, जेव्हा तो 16-18 वर्षांचा होता, तेव्हा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आपल्याला सतत आत्महत्येचे विचार येत असल्याचे अभिनेत्याने सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्याने अनेक मेहनत घेतल्यानंतरत्याच्या मनातून हे विचार निघून गेले. त्यानंतर त्याने आपल्या करिअरवर फोकस केला आणि प्रसिद्धी मिळवली.

(Happy Birthday Amit Sadh know about actors career journey)

हेही वाचा :

Palak Tiwari : पलक तिवारीचं सोशल मीडियावर कमबॅक, हॉट अँड ग्लॅमरस फोटो शेअर

विक्कीसोबतच्या नात्याला कतरिना जगजाहीर करणार! लवकरच उचलू शकते ‘हे’ मोठे पाऊल

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI