AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विक्कीच्या बाबतीत कतरिना झाली पझेसिव्ह, चित्रपटात ‘तसले’ सीन करण्यास केली मनाई!

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आपल्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे सध्या खूप चर्चेत आहेत. दोघांना बर्‍याच वेळा एकत्र पाहिले जाते.

विक्कीच्या बाबतीत कतरिना झाली पझेसिव्ह, चित्रपटात 'तसले' सीन करण्यास केली मनाई!
कतरिना कैफ आणि विक्की कौशल
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 2:24 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आपल्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे सध्या खूप चर्चेत आहेत. दोघांना बर्‍याच वेळा एकत्र पाहिले जाते. कधी हे दोघे एखाद्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात, तर कधी एकमेकांच्या घरी जाताना. आतापर्यंत दोघेही रिलेशनशिपच्या बातम्यांवर प्रतिक्रिया टाळायचे आणि एकमेकांना मित्र म्हणून संबोधत असत, पण आता हे दोघंही आपलं नातं स्वीकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे (Katrina Kaif And Vicky Kaushal will going to make their relationship official).

कतरिना आणि विक्की एक कपल म्हणून आपले नाते जगजाहीर  करावे त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे आणि लवकरच हे दोघेही सोशल मीडियावर पोस्ट करून याची घोषणा करतील अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. तथापि, अद्याप यावर दोघांनीही कुलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कतरिनाची इच्छा

रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, कतरिनाला विकीने त्याच्या को-स्टारसह इंटिमेट सीन करू नये असे वाटते आहे. विक्कीने यापूर्वी ‘मनमर्जिया’ आणि ‘लव्ह पर स्क्वेअर फीट’मध्ये लव्ह मेकिंग सीन्स दिले आहेत आणि कतरिनाला भविष्यकाळात विक्कीने असे सीन करू नयेत असे वाटते आहे.

असे म्हटले जात होते की, नवीन वर्षात दोघांनी आपल्या भावासह बहिणीबरोबर नवीन वर्ष एकत्र साजरे केले होते. कारण, त्यावेळी कतरिनाने बहिणीसमवेत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्या छायाचित्रातील आरशामध्ये विक्कीची झलकदेखील दिसली. फोटो व्हायरल झाल्यानंतर कतरिनाने तो डिलीट केला. यानंतर ट्विटरवर कतरिनाचा एक फोटो व्हायरल झाला आणि चाहत्यांनी असे म्हटले की, कतरिनाने विक्कीलाच मिठी मारली आहे. हा फोटो व्हायरल होत असतानाच ‘Vikkat’ हॅशटॅगही व्हायरल झाला होता (Katrina Kaif And Vicky Kaushal will going to make their relationship official).

प्रोफेशनल लाईफ

कतरिनाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात कतरिनासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय कतरिना ‘फोन भूत’ आणि ‘टायगर 3’मध्ये ही दिसणार आहे. फोन भूतमध्ये कतरिनासमवेत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी आहेत. त्याचवेळी ‘टायगर 3’मध्ये सलमान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दुसरीकडे, विक्कीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल जर आपण बोललो तर, तो ‘सरदार उद्यम सिंग’मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त तो माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सोबतही एका चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

(Katrina Kaif And Vicky Kaushal will going to make their relationship official)

हेही वाचा :

Meenakshi Seshadri | लाखोंच्या हृदयाची ‘धडकन’, कुमार सानूशी चर्चित अफेअर, आता कुठे गायब झालीय बॉलिवूडची ‘दामिनी’?

Yami Gautam | अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाह बंधनात, ‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत घेतले ‘सातफेरे’!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.