Happy Birthday Ayesha Takia | लग्नानंतर चित्रपटसृष्टीला गुडबाय, लीप सर्जरीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली अभिनेत्री आयेशा टाकिया!

Happy Birthday Ayesha Takia | लग्नानंतर चित्रपटसृष्टीला गुडबाय, लीप सर्जरीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली अभिनेत्री आयेशा टाकिया!
आयेशा टाकिया

आज (10 एप्रिल) बॉलिवूडमधील क्युट अभिनेत्री आयेशा टाकिया (Ayesha Takia) हिचा वाढदिवस आहे. ‘टार्झन : द वंडर कार’ आणि ‘वाँटेड’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकणारी आयशा बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे.

Harshada Bhirvandekar

|

Apr 10, 2021 | 10:28 AM

मुंबई : आज (10 एप्रिल) बॉलिवूडमधील क्युट अभिनेत्री आयेशा टाकिया (Ayesha Takia) हिचा वाढदिवस आहे. ‘टार्झन : द वंडर कार’ आणि ‘वाँटेड’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकणारी आयशा बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. चला तर, या खास निमित्ताने तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया…(Happy Birthday Ayesha Takia know about cute actress career)

खूप कमी लोकांना हे माहित आहे की आयेशाने करिअरची सुरूवात फिल्मद्वारे नव्हे तर, एका जाहिरातीद्वारे केली होती. लहान असताना ती कॉम्पलेनच्या एका जाहिरातीमध्ये दिसली होती. यानंतर, ती फाल्गुनी पाठक यांच्या ‘मेरी चुनर उड उड उड जाय’ या गाण्यात दिसली होती. या गाण्यातील निरागस आयेशाने सर्वांची मने जिंकली होती.

‘टार्झन’मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश

यानंतर आयेशाने ‘टार्झन : द वंडर कार’ या चित्रपटात प्रमुख अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. चित्रपटातील तिच्या गोंडस आणि चंचल शैलीने चाहत्यांची मने जिंकली. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण पुरस्कार मिळाला होता. आयेशाने यानंतर बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. परंतु, तिला ‘वाँटेड’ या चित्रपटामुळे सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. यामध्ये ती सलमान खानबरोबर झळकली होती.

जेव्हा आयेशाच्या करिअरचा आलेख वेगाने वाढत होता, तेव्हाच आयेशाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2009मध्ये आयशाने समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयेशा आणि फरहानने लग्नापूर्वी 4 वर्ष एकमेकांना डेट केले होते. बर्‍याच लोकांनी आयेशाच्या लग्नाच्या निर्णयाला चुकीचे म्हटले होते. चाहत्यांचे म्हणणे होते की, आयशाने असे करिअर सोडून इतक्यात लग्न करू नये. परंतु, आयेशाने तिला जे उचित वाटले तेच केले. यानंतर या दोघांना वर्ष 2013मध्ये ‘मिखाईल आझमी’ नावाचा मुलगा झाला (Happy Birthday Ayesha Takia know about cute actress career).

हॉट अवतार पाहून चाहते झाले दंग

चित्रपटांमध्ये नेहमीच साधी आणि गोंडस दिसणाऱ्या आयेशाचा अचानक सोशल मीडियावर हॉट अवतार पाहून चाहत्यांना धक्काच बसला. वास्तविक आयेशा चित्रपटांपासून दूर असली, तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत राहते. अनेकदा तिने आपले हॉट आणि बोल्ड फोटोही शेअर केले आहेत.

ओठांच्या शस्त्रक्रियेमुळे आली चर्चेत

चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर आयेशाने तिचे काही नवे फोटो शेअर केले, तेव्हा तिचे ओठ पाहून चाहते स्तब्ध झाले. असे म्हटले जात होते की, आयशाची ओठांची शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, तिने हे स्वीकारण्यास नेहमी नकार दिला आहे. ती ट्रोलर्सला अजिबात महत्त्व देत ​​नाही. लग्नानंतर आणि मुलाच्या जन्मानंतर आयशा आता आपल्या फॅमिलीबरोबर वेळ घालवून त्यांची काळजी घेण्यासाठी चित्रपटांपासून दूर झाली आहे.

(Happy Birthday Ayesha Takia know about cute actress career)

हेही वाचा :

Kapil Sharma | कपिल शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा! चौथीच्या पुस्तकात सामील झाली ‘कॉमेडी किंग’च्या संघर्षाची कहाणी

बंगालच्या निवडणुकीत राजकारण पेटलेलं असताना खासदार नुसरत जहांचा हॉट फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें