Raveena Tandon Birthday : मॉडेलिंगसाठी शिक्षण सोडलं, 44 वर्षी आजी झाली, वाचा रवीनाचे लय भारी किस्से

गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.

Raveena Tandon Birthday : मॉडेलिंगसाठी शिक्षण सोडलं, 44 वर्षी आजी झाली, वाचा रवीनाचे लय भारी किस्से

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. रवीना टंडन मोस्ट अवेटेड चित्रपट अससेल्या केजीएफ 2 (KGF 2) या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती डलहौसी येथे असून एका वेब सिरीजचं चित्रीकरण करत आहे.

अभिनय आणि मनमोहक अदांनी 90’s मध्ये सर्वांचं मन जिंकणाऱ्या रवीनाचा आज 46 वा वाढदिवस आहे. (raveena tandon 46th birthday) 90 च्या दशकात तिने अनेक जबरदस्त चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलचे कधीही न ऐकलेले किस्से जाणून घ्या.

रवीनाचा जन्म 26 ऑक्टोबर 1974 ला मुंबईत झाला. तिचं संपूर्ण शिक्षणही इथेच झालं. तिने कधीही ठरवलं नव्हतं किंवा विचारही नव्हता केला की ती कधी चित्रपटसृष्टीत काम करेल. ती कॉलेजमध्ये असताना तिला मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या. मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे ठरवल्यानंतर तिने महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडून दिलं. 1991 साली प्रदर्शित झालेल्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पहिल्याच चित्रपटासाठी तिने फिल्मफेअर पुरस्कारही मिळवला.

बॉलिवूड अभिनेते मॅकमोहन यांची भाची

खूप कमी लोकांना माहीत असेल की, रवीना बॉलिवूड अभिनेते मॅकमोहन यांची भाची आहे. त्यांनी तिचं नाव मुनमुन ठेवलं होतं. डेब्यूनंतर रवीनाने ‘मोहरा’, ‘दिलवाले’ आणि ‘लाडला’ सारखे चित्रपट केले, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. तिच्या करिअरमध्ये तिने बिग बी अमिताभ बच्चन, गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगण सारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे.

ताप आणि पिरियड्सदरम्यान शुट केलं ‘टिप टिप बरसा…’

रवीनाचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाला तिचं ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं डोळ्यासमोर येतं. या गाण्याने तिला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. हे गाणं ‘मोहरा’ या चित्रपटातील असून अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत शुट केलं आहे. असं म्हटलं जातं की, या गाण्याच्या शुटिंगवेळी रवीना तापाने फणफणत होती, तसेच तेव्हा तिचे पिरियड्सही सुरु होते. तरीदेखील रवीनाने एक अप्रतिम गाणं शुट केलं.

अक्षय-रवीनाचा साखरपुडा

अक्षय कुमार आणि रवीना ‘मोहरा’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते, अशा अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी लपून-छपून साखरपुडादेखील केला होता. दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु नंतर दोघेही वेगळे झाल्याचा बातम्या समोर आल्या.

44 व्या वर्षी झाली आजी

रवीना 20 वर्षांची असताना तिने छाया आणि पूजा नावाच्या दोन मुलींना दत्तक घेतले होते. गेल्या वर्षी रवीनाची मुलगी छाया हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. रवीनाने या नव्या सदस्याचे जोरदार स्वागत केले होते. आजी झाल्याची बातमी रवीनाने सोशल मीडियावर शेअर केली होती.

रविना टंडन दिसणार इंदिरा गांधींच्या भूमिकेत

‘केजीएफ 2’ मध्ये रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

संबंधित बातम्या

Drug Case | ‘महाबली हनुमान’ फेम अभिनेत्रीची ‘ड्रग्ज खरेदी’, प्रीतिका चौहान एनसीबीच्या ताब्यात!

Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी, खासदार अनुप्रिया पटेल यांचे पंतप्रधानांना साकडे!

ऋतिक रोशनने मुंबईत घेतले 2 आलिशान फ्लॅट; किंमत पाहून व्हाल थक्क

(Happy birthday Raveena Tandon : leaves education for modeling, became a grandmother at 44 year age)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *