Drug Case | ‘महाबली हनुमान’ फेम अभिनेत्रीची ‘ड्रग्ज खरेदी’, प्रीतिका चौहान एनसीबीच्या ताब्यात!

‘संकटमोचन महाबली हनुमान’ या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.

Drug Case | ‘महाबली हनुमान’ फेम अभिनेत्रीची ‘ड्रग्ज खरेदी’, प्रीतिका चौहान एनसीबीच्या ताब्यात!
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 4:27 PM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी अनेक मोठी नावे समोर आली आहेत. यापैकी बऱ्याच जणांना समन्स पाठवून एनसीबीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात मालिका विश्वातल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. ‘संकटमोचन महाबली हनुमान’ या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने (NCB Arrest Preetika Chauhan) बेड्या ठोकल्या आहेत. (Bollywood drug connection NCB Arrest Sankatmochan Mahabali Hanuman fame TV actress Preetika Chauhan)

प्रीतिका ड्रग्ज तस्कराकडून ड्रग्ज विकत घेत असताना तिला एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. यानंतर प्रीतिका चौहानच्या घरी काल (24 ऑक्टोबर) एनसीबीने छापेमारी केली होती. ज्यामध्ये एनसीबीच्या हाती भक्कम पुरावे लागल्याने तिला अटक करण्यात आली आहे (NCB Arrest Preetika Chauhan). अभिनेत्री प्रीतिका चौहान ही ‘संकटमोचन महाबली हनुमान’ या मालिकेत मुख्य भूमिका सकारात आहे. दरम्यान तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी एनसीबी टीमने तिला मेडिकल टेस्टसाठी नेले होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू झालेल्या ड्रग्स कनेक्शनमध्ये आणखी काही सेलिब्रेटी अडकण्याची शक्यता आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमाडले ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि आणखी 21 जणांना अटक केली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर यांचीही नावे समोर आल्याने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. (Bollywood drug connection NCB Arrest Sankatmochan Mahabali Hanuman fame TV actress Preetika Chauhan)

वर्सोवा भागात एनसीबीने रचला सापळा!

याच प्रकरणात एनसीबीला आणखी एका ड्रग तस्कराबाबत कुणकुण लागल्याने त्यांनी साध्या वेशात मुंबईतल्या वर्सोवा भागात सापळा रचला होता. एनसीबीच्या या सापळ्यात पाच जण अडकले आहेत. यापैकी दोघांजवळ 99 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तर, यावेळी टीव्ही अभिनेत्री प्रीतिकाला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या अभिनेत्रीला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. एनसीबीची ही धडक कारवाई अद्याप सुरूच आहे.

अर्जुन रामपालच्या मेहुण्याला अटक

एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले. ड्रग्ज कनेक्शन तपासादरम्यान नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. शिवाय त्याचाकडून ‘हॅश’ आणि ‘अल्प्राझोलम’ हे ड्रग्जदेखील जप्त करण्यात आले आहेत. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Bollywood drug connection NCB Arrest Sankatmochan Mahabali Hanuman fame TV actress Preetika Chauhan)

‘सावधान इंडिया’च्या दिग्दर्शकाची चौकशी

अ‍ॅगिसिलोस याच्या चौकशीत ‘सावधान इंडिया’चा सोहेल कोहलीचे नाव समोर आले. त्यामुळे एनसीबीने सोहेल याची देखील चौकशी केली आहे. सोहेल याच्यावर ड्रग्जचे वितरण करणे आणि सेवन करणे असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने एनसीबीकडून चौकशी त्याची करण्यात आली आहे. तब्बल सहा तास त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे.

(Bollywood drug connection NCB Arrest Sankatmochan Mahabali Hanuman fame TV actress Preetika Chauhan)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.