AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Sood फक्त ५ हजार घेवून आला होता मुंबईत; आज गडगंज संपत्तीचा मालक

कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे सोनू सूद; मुंबईत भव्य घर, महागड्या गाड्या, कमाईचे अनेक पर्याय आणि बरंच काही..., अभिनेत्याची संपत्ती जाणून व्हाल थक्क

Sonu Sood फक्त ५ हजार घेवून आला होता मुंबईत; आज गडगंज संपत्तीचा मालक
| Updated on: Jul 31, 2023 | 2:52 PM
Share

मुंबई | 31 जुलै 2023 : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अनेक दिवसांपासून अनेकांची मदत करत आहे. अभिनेत्याच्या याच स्वभावामुळे देशभरातील जनतेचं सोनू सूद याला प्रेम मिळत आहे. अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला न्याय देणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांचा ‘हिरो’ झाला आहे. सोनूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोनू सूद याची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत गप्पा मारण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे. म्हणून अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी सोनूच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. शिवाय अनेकांनी अभिनेत्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र सोनू याची चर्चा रंगली आहे.

सोनू याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ‘शहीद-ए-आझम’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सोनू याने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

रिपोर्टनुसार, मुंबईत फक्त ५ हजार रुपये घेवून आलेला सोनू सूद आज मात्र कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सोनूच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, अभिनेत्याकडे तब्बल १३५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सिनेमा, जाहिराती, रिऍलिटी शोंच्या माध्यमातून अभिनेता कोट्यवधी रुपयांचा कमाई करतो. अभिनेत्याचं मुंबई येथे लोखंडवाला याठिकाणी भव्य घर आहे. शिवाय अभिनेत्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. पोर्श, मर्सडीज यांसारख्या महागड्या गाड्या अभिनेत्याकडे आहेत. सध्या सर्वत्र अभिनेचत्याची चर्चा आहे.

एका सिनेमात भूमिका साकारण्यासाठी अभिनेता जवळपास २ ते ३ कोटी रुपये मानधन घेतो. सोनू याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच साउथ सिनेमा ‘तमिलरासन’ आणि बॉलिवूड ‘फतेह’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते सध्या अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. सोनू सूद कायम स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत चाहच्यांसोबत गप्पा मारत असतो. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. चाहते देखील अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतो.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.