AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Bachchan : ‘तो माझ्या मोठ्या भावासारखा..’ बॉलिवूडमध्ये येण्याआधीपासून शाहरुख-अभिषेकचा खास बाँड

King : शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन व्हिलनच्या भूमिकेत असेल. तो नुकताच शाहरुखसोबतच्या त्याच्या नात्यालवर बोललाय.

Abhishek Bachchan : ‘तो माझ्या मोठ्या भावासारखा..’ बॉलिवूडमध्ये येण्याआधीपासून शाहरुख-अभिषेकचा खास बाँड
| Updated on: Oct 07, 2026 | 4:31 PM
Share

बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल पण शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे काही फक्त सहकलाकार नाहीत तर अभिनय क्षेत्रात येण्याआधीपासूनच दोघांचीमैत्री आहे. दोघं खूप जवळचे मित्र असून त्यांच्यात खास नातं आहे. एका इंटरव्ह्यूदरम्यान बोलताना खुद्द अभिषेक बच्चनने सांगितलं की शाहरुख हा माझ्या मोठ्या भावासारखा आहे. एवढंच नव्हे तर, त्याने करिअरमध्ये अनेकदा साथ दिली असंही अभिषकेन नमूद केलं. नुकत्याच एका मुलाखतीत अभिषेक हा शाहरुखबद्दल भरभरून बोलला.

” शाहरूख खान हा माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. खरं सांगायचं तर त्याने अनेकदा माझ्या करिअरची पर्सनलरित्या काळजी घेतली. आमच्या ‘किंग’ या अपकमिंग चित्रपटाचाही त्यात समावेश आहे” असं अभिषेकने नमूद केलं. बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याआधीही मी शाहरुखच्या खूप क्लोज होते, आमचा बाँड होता, असं अभिषेकने सांगितलं. यावेळी बालपणीच्या आणि सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना त्याने सांगितलं की, त्या काळात रविवार म्हणजे चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांच्या घरी क्रिकेट खेळण्याचा दिवस असायचा. या क्रिकेट ग्रुपमध्ये उदय चोप्रा, हृतिक रोशन आणि सिकंदर खेर यांच्यासह अनेक जण नेहमी सहभागी असायचे.

शाहरुख खानही हा देखील आमच्या मित्रांच्या ग्रुपचा एक भाग होता, असं अभिषेक म्हणाला. हळूहळू शाहरुख संपूर्ण ग्रुपसाठी एका “मोठ्या भावासारखा” झाला. काळानुसार आमची मैत्री आणखी घट्ट होत गेली आणि आजही आम्ही दोघं दोघे एकमेकांच्या खूप जवळचे आहोत, असं अभिषेकने आवर्जून नमूद केलं.

‘किंग’मध्ये अभिषेक साकारणार नकारात्मक भूमिका

दरम्यान शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटात अभिषेक बच्चन कथितपणे मुख्य खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्याची ही भूमिका त्याच्या अलीकडील चित्रपटांमधील व्यक्तिरेखांपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’ आणि ‘कालीधर लापता’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिषेक संवेदनशील आणि सौम्य व्यक्तिरेखांमध्ये दिसला होता. एका रिपोर्टनुसार, नकारात्मक भूमिका साकारण्याबाबत अभिषेक सुरूवातीला थोडा साशंक होता. मात्र, शाहरुख खानने त्याला ही भूमिका स्वीकारण्यासाठी मनवलं.

आधीही केलंय एकत्र काम

दरम्यान यापूर्वीही या दोन्ही कलाकारांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 2006 साली प्रदर्शित झालेला ‘कभी अलविदा ना कहना’ आणि 2014 मधील ‘हॅप्पी न्यू ईयर’ या चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चन आणि शाहरुख खान एकत्र झळकले होते. तर आता अनेक वर्षआंनी ते दोघे पुन्हा ‘किंग’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’मध्ये शाहरुख खान, सुहाना खान, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

Follow Us
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा