Dharmendra Death : घर कधीच उद्ध्वस्त केलं नसतं… सवतीने कधीचं नाही पाहिलं हेमा मालिनी यांचं तोडं, पण नवऱ्याच्या निधनानंतर…
Dharmendra Death : हेमा मालिनी यांचं कधीन नाही पाहिलं तोंड, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची खंत, 'कोणाचं घर कधीच उद्ध्वस्त केलं नसतं...', अखेर नवऱ्याच्या निधनानंतर..., सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या कुटुंबाची चर्चा...

Dharmendra Death : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 मध्ये अखेरचा श्वास घेतला. निधनापूर्वी अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण वयाच्या 90 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे. अभिनय विश्वात पदार्पण करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. पण अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर धर्मेंद्र यांचा जीव अशा प्रकारे जडला, की ते पहिलं लग्न विसरुन गेले… धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न हेमा मालिनी यांच्यासोबत केल्यानंतर, सवतीसमोर हेमा मालिनी कधीच आल्या नाहीत.. पण दोघींनी एकमेकींबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या.
हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी स्वतःचा धर्म देखील बदलला होता. हिंदू धर्मात पहिल्या पत्नी घटस्फोट देत नाही, तोपर्यंत दुसरं लग्न करण्याची परवानगी नसते… याच कारणामुळे धर्मेंद्र यांनी दुसरा धर्म स्वीकारला… दोघांच्या नात्याच्या चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रंगल्या होत्या.
धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळल्यानंतर प्रकाश कौर यांना मोठा धक्का बसला… लग्नानंतर हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची कधी पायरी देखील चढल्या नाहीत… दरम्यान एका मुलाखतीत प्रकाश कौर यांनी मनातील खंत व्यक्त केली होती… ‘मी हेमा मालिनी यांच्या जागी असती तर, कधीच कोणाचं घर उद्ध्वस्त केलं नसतं…’
तर हेमा मालिनी म्हणालेल्या, ‘धर्मेंद्र यांना त्यांच्या मुलांपासून वेगळं करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता…’, पण नशिबाचा खेळ तर बघा… आयुष्यभर हेमा मालिनी आणि प्रकाश कौर यांनी कधीच एकमेकींचं तोंड पाहिलं नाही. पण धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दोघी एकमेकींसमोर आल्या.
धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. ज्यामुळे त्यांनी मुंबई येथील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी धर्मेंद्र यांनी डिस्चार्ज देखील दिला आणि जुहू येथील राहत्या घरी धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. पण 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांसोबतच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. तर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
