Dharmendra : दुसरी बायको कधीच..; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची अवस्था पाहून नेटकऱ्यांना आली कीव!
Dharmendra : दुसरी बायको कधीच..., आयुष्यातील काही गोष्टींचा हेमा मालिनी यांना होतोय पश्चाताप... हेमा मालिनी यांची अवस्था पाहून नेटकऱ्यांना आली कीव..., सर्वत्र चर्चांना उधाण

Dharmendra Death : बॉलिवूडचे दोन सुपरस्टार धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण धर्मेंद्र आणि हेमा मालिनी त्यांच्या खसागी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. 1980 मध्ये समाजाच्या आणि कुटुंबियांच्या विरोधात जात धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सर्वकाही माहिती असताना देखील संसार थाटला. पण हा प्रवास त्यांच्यासाठी फार सोपा नव्हता… अशात हेमा मालिनी यांना दुसऱ्या बायकोचा टॅग लागला… आता देखील हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
धर्मेंद्र यांच्या नुकताच झालेल्या निधनानंतर, हेमा मालिनी “दुसरी बायको” असल्याच्या चर्चांनी पुन्हा धरल्या. धर्मेंद्र यांच्या शोक समोर असं चित्र दिसून आलं, ज्यामळे धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबाच्या चर्चा सुरु झाल्या. शोक सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन दिसल्या नाहीत. त्यामुळे, प्रत्येकजण हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींबद्दल विचार करताना दिसले…
दुसरी बायको कधीच बनू नका…
परिस्थिती पाहता असं म्हटलं जात आहे की, प्रत्येक स्त्री हेलनसारखी भाग्यवान नसते आणि प्रत्येक मुलगा सलमान खानसारखा आदरणीय नसतो. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराचे देखील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले… ज्यामध्ये ईशा देओल एकटी स्मशानभूमीत पोहोचली… तर हेमा मालिनी देखील उशिरा स्मशानभूमित पोहोचल्या…
View this post on Instagram
हेमा मालिनीसोबत घडलेल्या या परिस्थिती पाहिल्यानंतर लोकांमध्ये फक्त एकच गोष्ट चर्चेत राहिली आणि ती म्हणजे कधीही दुसरी महिला बनू नका… सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं. ज्यामुळे हेमा मालिनी यांना कधीच वैवावाहिक आयुष्याचा आनंद लुटता आला नाही…
रिपोर्टनुसार, देओल कुटुंबियांनंतर हेमा मालिनी यांनी देखील धर्मेंद्र यांच्यासाठी शोकसभेचं आयोजन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4.00 ते 6.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे. धर्मेंद्र यांच्यासाठी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ, नवी दिल्ली येथे प्रार्थना सभा आयोजित केली जाईल.
