AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मुलींचं आयुष्य झालंय खडतर, हेमा मालिनी म्हणाल्या, ‘दोघींना पाहते तेव्हा वाटतं…’

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर फक्त त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला नाही तर, कुटुंबात देखील मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी कधीच भरुन न निघण्यासारखी आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दोन मुलींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मुलींचं आयुष्य झालंय खडतर, हेमा मालिनी म्हणाल्या, 'दोघींना पाहते तेव्हा वाटतं...'
Hema Malini
| Updated on: Jul 21, 2026 | 8:50 AM
Share

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनांतर कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. मृत्यूपूर्वी धर्मेंद्र आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाला आज अनेक महिने झाले आहेत. पण त्यांचं निधन झालं आहे, यावर विश्वासच बसत नाही… अभिनेत्री हेमा मालिनी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी, धर्मेंद्र यांच्याबद्दलच बोलताना दिसल्या…

मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘याबद्दल बोलताना मला प्रचंड अस्वस्थ वाटतं आहे. पण देवाचे मला आभार मानयचे आहेत, कारण त्यांनी माझ्या आयुष्यात धर्मेंद्र यांच्यासारख्या खास व्यक्तीला पाठवलं… त्यांच्यासोबत अनेक आठवणी जगण्याची संधी मला मिळाली… मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या आठवणी माझ्यासोबत ठेवेल. त्यांची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही… ते माझ्या आयुष्याचे, माझ्या करियरचे आणि प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रॉन्ग पिलर होते…’

‘लग्नानंतर धर्मेंद्र यांनी कधीच मला काम किंवा माझं करियर सोडण्यासाठी सांगितलं नाही. उलट त्यांनी कायम मला पाठिंबा दिला. त्यांनी मला जे करायचं आहे, ते करु दिलं… लग्नानंतर त्यांनी कधीच मला घरी बसवलं नाही. त्यांना माहिती होतं, मी एक कलाकार आहे. मी डान्सर आहे… त्यांनी माझी प्रगती पाहिली आहे… ते मला कायम म्हणायचे, सिनेमे करत राहा… डान्स करत राहा… कधीच थांबू नकोस…’, असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.

यावेळी मुलींबद्दल देखील हेमा मालिनी यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘वडिलांच्या निधनानंतर माझ्या दोन्ही मुली पूर्णपणे खचल्या आहे. जेव्हा मी दोघींकडे पाहते तेव्हा मला वाटतं, माझ्या मुली प्रचंड दुखावल्या आहे. त्यांचे वडील त्यांच्यासोबत नाहीत आणि त्यांच्या मनातील ही जागा कायम रिकामी राहिल…’, असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगायचं झालं तर,  धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालेलं असताना आणि चार मुलं असताना देखील त्यांनी समाजाच्या कुटुंबियांच्या विरोधात जात हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर हेमा मालिनी कधीच धर्मेंद्र यांच्या मुख्य घरी गेल्या नाहीत. धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल हेमा मालिनी कायम सांगत असतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...