AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्हाला पटेल किंवा..’ अरबाजसाठी हेमांगी कवीची पोस्ट, अभिजीत म्हणाला ‘बाज नहीं आओगी तुम’

'बिग बॉस मराठी 5'च्या घरातून अरबाज पटेल बाद झाल्यानंतर अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिजीत केळकर हेमांगीला म्हणाला, 'अर्रर बाज... नहीं आओगी तुम अपनी हरकतोंसे..'

'तुम्हाला पटेल किंवा..' अरबाजसाठी हेमांगी कवीची पोस्ट, अभिजीत म्हणाला 'बाज नहीं आओगी तुम'
Arbaaz Patel and Hemangi KaviImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 24, 2024 | 1:40 PM
Share

‘बिग बॉस मराठी 5’मधून नुकताच अरबाज पटेल बाद झाला. गेल्या आठवड्यात त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं. निक्की तांबोळीने त्याला घराचा कॅप्टन बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण नशिबाच्या खेळामुळे अरबाजला घरातून बाहेर पडावं लागलं होतं. बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी ही जोडी तुफान चर्चेत होती. अरबाज घरातून बाहेर जाणार असल्याचं कळताच निक्की ढसाढसा रडली. या एलिमिनेशनवर आता मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. हेमांगीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हेमांगी कवीची पोस्ट-

‘तुम्हाला ‘पटेल’ किंवा नाही पटणार पण मज्जा गेली राव’, असं लिहित हेमांगीने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. हेमांगीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्याने अनेकांना आनंद झाला. त्यामुळे हेमांगीच्या या पोस्टवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अभिनेता अभिजीत केळकरनेही हेमांगीच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अर्रर बाज… नहीं आओगी तुम अपनी हरकतोंसे’, असं त्याने उपरोधिकपणे लिहिलंय. तर ‘मज्जा आली उलट’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘निक्की पटलाय आम्हाला हा निर्णय’ अशीही उपरोधिक पोस्ट एका युजरने लिहिली आहे. ‘उलट खूप मज्जा आली, कारण घाबरलेली निक्की बघायला मिळाली’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडल्याने निक्कीसह सर्व सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातल्या या चॉकलेट बॉय अरबाजने आपल्या ताकदीच्या जोरावर अनेक टास्क जिंकले होते. गेल्या आठवड्याचा तो कॅप्टनदेखील होता. कॅप्टनच घरातून बाद झाल्याची घटना बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली होती.

अरबाज आणि निक्कीमुळे बिग बॉसचा प्रत्येक आठवडा गाजला. बिग बॉसच्या घराबाहेर, सोशल मीडियावरही या दोघांची जोरदार चर्चा झाली. अरबाज आणि निक्कीला घरातून बाहेर काढण्याची मागणी वारंवार प्रेक्षकांकडून होत होती. बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीला एकमेकांचा आधार होता. म्हणूनच जेव्हा अरबाज घराबाहेर जाणार हे जाहीर झालं, तेव्हा निक्की ढसाढसा रडू लागली होती.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.