हिंदी सिनेमा प्रत्येक इंडस्ट्रीचा बाप… सुनील शेट्टी यांचं विधान; News9 Global Summit 2025मध्ये काय काय म्हणाले?
News9 Global Summit 2025मध्ये सुनील शेट्टी यांचं मोठं वक्तव्य, सिनेविश्वाबद्दल म्हणाले, 'हिंदी सिनेमा प्रत्येक इंडस्ट्रीचा बाप...', सुनील शेट्टी कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे असतात चर्चेत

टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’मध्ये अनेक सेलिब्रिटींना हजेरी लावली होती. विवेक ओबेरॉय, विनीत कुमार सिंह, रिद्धि डोगरा, साइरस बरोचा यांनी देखील समिटमध्ये हजेरी लावली होती. अभिनेते सुनील शेट्टी यांनी देखील समिटमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी सुनील शेट्टी यांनी अनेक मुद्द्यांवर वक्तव्य केलं. शिवाय आगामी सिनेमा ‘हेरा फेरी 3’ बद्दल देखील स्पष्टीकरण दिले. सिनेमा गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त परिस्थितीत अडकला आहे.
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वाबद्दल काय म्हणाले सुनील शेट्टी?
सुनील शेट्टी यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान त्यांना विचारण्यात आलं, बॉलिवूडची सध्याची स्थिती पाहता, बॉलिवूडची प्रगती होत आहे की बॉलिवूड अधोगतीकडे जात आहे? यावर सुनील शेट्टी म्हणाले, ‘सध्या तरी काहीही सांगू शकत नाही की आम्ही कुठे आहोत. कोणत्याही सिनेविश्वातील सिनेमाला आजच्या घडीला प्रेम मिळत असेल तर ते सांगतात आम्ही बॉलिवूडपेक्षा मोठे आहोत.’
‘पण प्रामाणिकपणे बोललो तर मला वाटतं की हिंदी सिनेमा हा इतर सर्व सिनेविश्वाचा बाप आहे. ही एक अशी भाषा आहे जी देशभर बोलली जाते. देशभरात उत्कृष्ट सिनेमे बनत आहेत. मी सामान्यतः हा याला भारतीय सिनेमा मानतो कारण आपण जागतिक चित्रपटांशी एकजुटीने स्पर्धा करत आहोत. पण जर कोणत्याही उद्योगात तुम्हाला एक्सेल शीट्सवर कंटेंटवर कसं काम करायचे हे सांगितलं जातं आणि सर्जनशील लेखक तुम्हाला हे सांगत नाहीत. तर ती खूप चिंतेची बाब आहे.’
‘मला असं वाटतं की सध्याच्या काळात सर्वकाही फक्त आणि फक्त ब्रँडवर निर्भर आहे. जर तुमचा ब्रँड मोठा असेल तर, लोकं देखील कायम तुमचीच निवड करतील…’ असं देखील अभिनेते सुनील शेट्टी म्हणाले आहेत.
‘हेरा फेरी 3’ बद्दल काय म्हणाले सुनील शेट्टी?
‘हेरा फेरी 3’ बद्दल देखील सुनील शेट्टी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मला माहिती आहे की ‘हेरा फेरी’ सिनेमा प्रेक्षकांना आवडेल. पण हे माझ्यामुळे होणार नाही. सक्सेसफुल फ्रेंचाइज असल्यामुळे सिनेमा हीट ठरेल. जर ‘हेरा फेरी 3’ यशस्वी झाला तर तो एका अभिनेत्यामुळे नाही तर तीन प्रमुख कलाकारांच्या संयोजनामुळे होईल. ‘हेरा फेरी 3′ त्याच्या तीन भूमिकांमुळे यशस्वी होईल.’ असं देखीले सुनील शेट्टी म्हणाले.
