AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार.. जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणार ‘बहिर्जी’

वासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत कोणताही वेष म्हणा.. बहिर्जी नाईक कोणाचीही अगदी उत्तम नक्कल करायचे. एखाद्या व्यक्तीने त्यांना एका वेशात पाहिलं आणि काही मिनिटांत दुसऱ्या वेशात पाहिलं तरी त्यांना ते किंचितही ओळखू शकत नसायचे. बहिर्जी नाईक यांची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार.. जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणार 'बहिर्जी'
BahirjiImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 18, 2024 | 9:33 AM
Share

मुंबई : 18 जानेवारी 2024 | सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय… बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार हाय… अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘बहिर्जी’ या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये मातीआड लपलेल्या अंगारासारखं धगधगतं काम करणारे बहिर्जी नाईक इतिहासात फारसे दिसले नाही. आता त्यांची यशोगाथा ‘बहिर्जी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. ‘बहिर्जी’च्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली असून चित्रपटात कलाकार कोण असतील याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीचं कुतूहल निर्माण झालं आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणाले, ” छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे आज आपल्यासाठी हिमानगाचे टोक आहे. बऱ्याच घटना काळाच्या उदरात अज्ञात आहेत. अशा काळात महाराजांची प्रत्येक योजना यशस्वी होण्यासाठी त्या योजनेचा पाया बनून राहिलेले बहिर्जी नाईक हे जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ठरतात. त्यांच्या योजनाच इतक्या गुप्त असायच्या की, त्यांचा मागोवा घेणेसुद्धा शक्य नव्हतं. मात्र अशा काळात स्वराज्य हे स्वप्न या मातीत रुजवणारे शिवराय आणि या स्वप्नासाठी जीव उधळायलासुद्धा तत्पर असणारे मावळे या साऱ्यांचे अवलोकन केलं, तर त्यातूनच बहिर्जी नावाची वीण हळुवार उलगडत जाते. हेच दाखवण्याचा प्रयत्न ‘बहिर्जी’ या चित्रपटातून आम्ही केला आहे.”

ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा वस्तुनिष्ठ वेध घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना निडर मावळ्यांची मोलाची साथ लाभली. त्यापैकीच एक नाव म्हणजे बहिर्जी नाईक. यांचं नाव अनेकजण ऐकून असतील पण त्यांचं कर्तृत्व मात्र इतिहासाच्या पानांमध्येच कैद असल्याचं पहायला मिळतं. बहिर्जी नाईक हे स्वराज्य सेनेच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून काम सांभाळत होते. या गुप्तहेर खात्याच्या सहाय्याशिवाय शत्रूप्रदेशात मोहिमा आणखं अशक्यच होतं.

बहिर्जी नाईक यांना लहानपणापासूनच बहुरुप्याची कला अवगत होती. विविध वेषांतरं करून ते समोरच्या व्यक्तीला पुरतं अचंबित करून सोडायचे. पुढे जाऊन पोटापाण्यासाठी त्यांनी एक व्यवसाय म्हणून बहुरुप्याची कला दाखवण्यास सुरुवात केली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.