AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2024 | बच्चन कुटुंबाची होळी, नव्याने शेअर केले फोटो, चाहते म्हणाले, ‘पण ऐश्वर्या कुठे आहे…’

Holi 2024 | बच्चन कुटुंबात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. बच्चन कुटुंबाने होलिका दहन देखील केलं. त्याचे फोटो नव्या हिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नव्या हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. नव्या कायम सोशल मीडियावर सक्रिय असते आणि कुटुंबातील कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Holi 2024 | बच्चन कुटुंबाची होळी, नव्याने शेअर केले फोटो, चाहते म्हणाले, 'पण ऐश्वर्या कुठे आहे...'
| Updated on: Mar 25, 2024 | 8:24 AM
Share

संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगांच्या सण म्हणून प्रचलीत असलेल्या होळीच्या दिवशी प्रत्येक जण एकमेकांना रंग लावून, सर्व राग, द्वेश विसरून नव्या सुरुवातीसाठी एकमेकांना शुभेच्छा देत असतो… शनिवारी बच्चन कुटुंबाने देखील होलिका दहन केलं. महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने होलिका दहनाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नव्या हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

नव्या हिने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये बिग बींची नात मामा अभिषेक बच्चन याला गुलाल लावताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रंग दिसत आहे. नव्याने शेअर केलेल्या एक फोटोमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील दिसत आहे. नव्या हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘होलिका दहन’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

नव्याच्या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या कुठे आहे…’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू कधी ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचे फोटो का नाही पोस्ट करत…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या – आराध्या कुटुंबाचा भाग नाही का?’ सध्या नव्याच्या पोस्टवर नेटकरी करत ऐश्वर्या आणि आराध्या यांच्याबद्दल विचारत आहेत.

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सर्वत्र ऐश्वर्या – आराध्या यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. पण कधीही दोघांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय ऐश्वर्या हिने स्वतःचा वाढदिवस फक्त आई आणि लेकीसोबत साजरा केल्यामुळे देखील दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. नुकताच संपूर्ण बच्चन कुटुंब देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी जामनगर येथे पोहोचलं होतं. सोशल मीडियावर बच्चन कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. पण आराध्या हिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अनंत – राधिका यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी पोहोचलेल्या आराध्या हिने तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा