AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Camryn Manheim : मला वाटायचं माझा मुलगा गे असावा! अभिनेत्रीची अजब इच्छा, मुलगा समलिंगी होण्यासाठी केलेले प्रयत्न

Camryn Manheim : अभिनेत्री कॅमरिन मॅनहाइम तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत आली असून अभिनेत्रीनं तिची विचित्र इच्छा सांगितली आहे. आपला मुलगा समलिंगी असावा अशी अभिनेत्रीची इच्छा होती.

Camryn Manheim : मला वाटायचं माझा मुलगा गे असावा! अभिनेत्रीची अजब इच्छा, मुलगा समलिंगी होण्यासाठी केलेले प्रयत्न
| Updated on: Sep 29, 2026 | 8:42 PM
Share

अमेरिकन अभिनेत्री कॅमरिन मॅनहाइम तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत आली. तिनं आपल्या मुलाला समलिंगी बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण ती अयशस्वी ठरली. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झालं असून यामध्ये तिनं स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिचा मुलगा समलिंगी असावा अशी तिची इच्छा होती. तिला समलिंगी मुलं आणि आई यांच्यातील नातं खूप आवडतं.

हॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

कॅमरिन मॅनहाइमचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला, ज्यामध्ये ती मंचावर बोलताना दिसत आहे. मात्र, तिचं वक्तव्य ऐकल्यानंतर नेटकरी चकित झाले. अभिनेत्रीनं आपल्या मुलाला हाय हील्स घालायला लावल्या, तो समलिंगी असावा अशी तिची इच्छा होती.

व्हिडिओमध्ये, कॅमरिन मॅनहाइम गंमतीने म्हणते, ‘मला अशी आई व्हायचं होतं, जी आपल्या मुलाच्या समर्थनार्थ पोस्टर घेऊन उभी राहील. जर माझ्या मुलाचा प्रश्न आला, तर मी कोणाशीही लढेन किंवा त्याला सामोरे जाईन. मला गे मुलं खूप आवडतात. मी माझ्या मुलाचे हाय हील्स आणि ड्रेसमध्ये फोटोसुद्धा काढले होते.’ अभिनेत्री म्हणते की, सुरुवातीला तिला वाटलं होतं की, तिचा मुलगा समलिंगी आहे, पण नंतर असं दिसून आलं की तो त्याच्या म्युझिकल थिएटर कंपनीमधील एकमेव स्ट्रेट मुलगा होता आणि त्यामुळे अभिनेत्रीचा प्लॅन पुरता फसला.

कॅमरीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर टीका केली आहे. मुलांवर पालकांनी स्वतःच्या आवडी लादू नयेत, असं युजर्सनी म्हटलं आहे.

कॅमरिनने अभिनेत्री मार्शा गे हार्डनबद्दलचा एक किस्साही सांगितला. तिने १० वर्षांपूर्वी मार्शासोबत झालेल्या एका संभाषणाची आठवण सांगितली. त्यावेळी तिनं पहिल्यांदा आपल्या समलिंगी मुलाबद्दल सांगितलेलं.यावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया होती, ‘अरे देवा, तू खूप नशीबवान आहेस!’ दरम्यान, अभिनेत्री मार्शानं २०२३ मध्ये सांगितलं की,तिची तिन्ही मुलं LGBTQ+ आहेत.

इतकंच नाही, तर कॅमरिन मॅनहाइमनं हॉलिवूडमध्ये मुलांच्या संगोपनाच्या पद्धतीवरही टीका केली आहे. मुलांच्या लैंगिकतेवरून पालक सहसा तणावात असतात, मात्र कॅमरीननं मुलाच्या गे असण्याला नशीब मानलं होतं.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप