AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्कार प्रकरणात ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटीला 16 वर्षांचा तुरुंगवास

वयाच्या ७१ व्या वर्षात 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीला बलात्कार प्रकरणात 16 वर्षांचा तुरुंगवास; उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवणार... सुनावणीनंतर निर्मात्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ

बलात्कार प्रकरणात 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीला 16 वर्षांचा तुरुंगवास
| Updated on: Feb 24, 2023 | 10:50 AM
Share

Harvey Weinstein : अमेरिकेचे चित्रपट निर्माते हार्वे वाइनस्टीन (Harvey Weinstein) याला आता त्याचं उर्वरित आयुष्यात तुरुंगात व्यतीत करावं लागणार आहे. कारण हार्वे वाइनस्टीन याच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्कार यांसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. ज्यामुळे निर्मात्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. नुकताच न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर हार्वे वाइनस्टीन याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. न्यायालयात हार्वे वाइनस्टीन याला दोषी ठरवण्यात आलं आहे. अशात हार्वे वाइनस्टीनला बलात्कार आणि लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरल्यानंतर 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लॉस एंजेलिस याठिकाणी झालेल्या तपासानंतर दोन महिन्यांनी हार्वे वाइनस्टीनला गुरुवारी शिक्षा सुनावण्यात आली. जवळपास १० वर्षांपूर्वी हार्वे वाइनस्टीन याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण आणि बलात्कार यांसारखे गंभीर आरोप लावले होते. महिलेची बाजू मांडत वकिलांनी हार्वे वाइनस्टीन याने एक वेळा नाही तर अनेकदा महिलेवर अत्याचार केलं असल्याचं सांगितलं आहे. (harvey weinstein net worth)

Harvey Weinstein को रेप केस में 16 साल की जेल, सलाखों के पीछे कटेगा बचा हुआ जीवन

डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व तपास आणि पुरावे पाहता हार्वे वाइनस्टीनला बलात्कार आणि लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्याला न्यूयॉर्कमध्ये २३ मध्ये १६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (what happened to harvey weinstein wife)

हार्वे वाइनस्टीन आता ७१ वर्षांचे होणार आहे. (harvey weinstein age) त्यामुळे आता त्यांचं संपूर्ण जीवन तुरुंगात जावू शकतं असं सांगण्यात येत आहे. हार्वे वाइनस्टीन हे हॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता आणि चर्चित सेलिब्रिटी आहे. दरम्यान हार्वे वाइनस्टीन याची टीव निर्मात्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

हार्वे वाइनस्टीनची कायदेशीर टीम मार्क वर्क्समन आणि अॅलन जॅक्सन यांनी जानेवारी महिन्यात एक याचिका दाखल केली होती. त्यांनी दाखल केलेली याचिका गुरुवारी न्यायाधीशांनी फेटाळली. धक्कादायक बाब म्हणजे हार्वे वाइनस्टीन याच्यावर १०० पेक्षा अधिक महिलांनी लैंगिक छळ, गैरवर्तन यांसारखे गंभीर आरोप केले होते. ( harvey weinstein life style)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...