AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारकडून सनी देओलला दरमहा येते इतकी रक्कम? मोफत रेल्वे प्रवासासह या व्हीआयपी सुविधा सुद्धा

अभिनेता सनी देओल आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता गडगंज कमाई करतो. पण भारत सरकारकडून देखील अभिनेत्याला ठराविक रक्कम येते. एवढंच नाही तर, अभिनेत्याला मोफत व्हीआयपी सुविधा सुद्धा मिळतात...

सरकारकडून सनी देओलला दरमहा येते इतकी रक्कम?  मोफत रेल्वे प्रवासासह या व्हीआयपी सुविधा सुद्धा
सनी देओल
| Updated on: Aug 06, 2025 | 4:17 PM
Share

‘गदर’ फेम अभिनेता सनी देओल याला कोणत्या ओळखीची गरज नाही. सनी देओल हा बॉलिवूडचा सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे. अभिनेत्याने स्वतःच्या कारकिर्दीत अनेक उत्तम सिनेमे बॉलिवूडवा दिले आहेत. 2023 मध्ये अभिनेत्याच्या ‘गदर 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तर या वर्षी आलेला त्याचा ‘जात’ हा सिनेमा देखील हिट ठरला. सांगायचं झालं तर, सनी देओल केवळ त्याच्या सिनेमांमधून भरपूर कमाई करत नाही तर त्याला भारत सरकारकडून पेन्शन आणि इतर अनेक भत्ते देखील मिळतात.

खरंतर, सनी देओल हा पंजाबमधील गुरुदासपूरचा माजी लोकसभा खासदार आहे. सनी देओलला पेन्शन व्यतिरिक्त सरकारकडून इतर कोणत्या सुविधा मिळतात. सनी देओल याने 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर पंजाबमधील गुरुदासपूर येथून निवडणूक लढवली आणि विजयी झाला. अभिनेता 2019 ते 2014 पर्यंत लोकसभा खासदार (भाजप) होता. त्याचा कार्यकाळ नुकताच जून 2024 मध्ये संपला.

भारत सरकार सनी देओलला किती पेन्शन देते?

भारतात, माजी खासदारांना पूर्वी दरमहा 25 हजार रुपये पेन्शन मिळत होती. पण आता ती रक्कम 31 हजार रुपये करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, सनी देओल याला भारत सरकारकडून दरमहा 31 हजार रुपये खासदार पेन्शन मिळत आहे.

सनी देओलला अनेक व्हीआयपी सुविधा मिळतात

पेन्शन व्यतिरिक्त, सनी देओलला भारत सरकारकडून अनेक व्हीआयपी सुविधा देखील मिळतात. त्याला आजीवन रेल्वे पास मिळतो. याद्वारे, तो आणि त्याचा एक साथीदार (पती/पत्नी किंवा सह-प्रवासी) फर्स्ट क्लास एसी किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये मोफत प्रवास करू शकतात. एवढंच नाही तर, माजी खासदार असल्याने, सनी देओल याला सरकारी लेटरहेड सारख्या मोफत टपाल सेवा आणि काही मर्यादित प्रमाणात मोफत पोस्ट/कुरियर सुविधा देखील मिळते.

दिल्लीतील अतिथीगृह सुविधा

दिल्लीमध्ये सरकारी कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी मर्यादित निवास सुविधा देखील उपलब्ध आहे. सरकारी अतिथीगृहांमध्ये फक्त माजी खासदारांनाच कमी दरात खोल्या मिळू शकतात. म्हणजेच माजी खासदार सनी देओल याला देखील ही सुविधा मिळते. पूर्वी माजी खासदारांना फोन बिल आणि टेलिफोन लाईनची सुविधा मिळते. आता हे प्रमाण खूपच कमी झालं आहे.

सनी देओल याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता लवकरच बॉर्डर 2, लाहोर 1947 आणि रामायण भाग 1 आणि भाग 1 मध्ये दिसणार आहे. अभिनेत्याच्या या सिनेमांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.