AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर नसते तर लोकांनी मला मारलंच असतं..; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

आजही तो प्रसंग आठवला की अंगारा शहारा येतो.. अशा शब्दांत अशोक सराफ त्या घटनेचं वर्णन करतात. 'हमिदाबाईंची कोठी' या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान हा किस्सा घडला होता. त्यावेळी नाना नसते तर लोकांनी मला मारलंच असतं, असं अशोक सराफ म्हणतात.

नाना पाटेकर नसते तर लोकांनी मला मारलंच असतं..; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
Nana Patekar and Ashok SarafImage Credit source: Instagram
| Updated on: May 06, 2025 | 12:03 PM
Share

‘हमिदाबाईंची कोठी’ हे अशोक सराफ यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं नाटक होतं. अशोक सराफ, नाना पाटेकर, नीना कुळकर्णी, भारती आचरेकर, प्रदीप वेलणकर, दिलीप कोल्हटकर असा त्यांचा नाटकाचा ग्रुप होता. या नाटकाच्या वेळीच अशोक सराफ यांनी बँकेची नोकरी सोडली. त्या आधीच ‘पांडू हवालदार’ आणि ‘रामराम गंगाराम’ यांसारख्या चित्रपटांमुळे अशोक सराफ प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले होते. या नाटकाशी संबंधित अशोक सराफ यांच्या अनेक आठवणी आहेत. अशीच एक घाबरवणारी आठवण त्यांनी ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात सांगितली आहे. त्यावेळी प्रसंगावधान राखत नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता.

एका गावात ‘हमीदाबाईंची कोठी’ या नाटकाचा प्रयोग होता. त्या गावात थिएटर म्हणावं असं काहीच नव्हतं. त्यामुळे एका मिलमध्ये स्टेज बांधून आणि समोर खुर्च्या ठेवून प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु नाटक सुरू झाल्यावर स्टेजवर खाली बसून नट मंडळी संवाद बोलू लागली की समोरच्या प्रेक्षकांना काहीच दिसत नव्हतं. अखेर पहिल्या पाच मिनिटांमध्ये पडदा पाडावा लागला. कलाकारांनी सगळं नाटक उभं राहूनच करावं, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली होती. परंतु ते शक्य नव्हतं. हे बोलणं चालू असतानाच बाहेर प्रेक्षक बोंबाबोंब करू लागले. त्यावेळी अशोक सराफ यांना अनेकजण ओळखत असल्यामुळे प्रेक्षक चिडले तर सर्वांत आधी त्यांनाच टार्गेट करणार, हे नाना पाटेकरांना समजलं होतं. तेव्हा नानांनी युक्ती लढवत थेट अशोक सराफांचा हात पकडला आणि थिएटरच्या मागच्या बाजूने दोघं चिखल तुडवत निघाले.

दुसरीकडे थिएटरमध्ये अक्षरश: मारामारीला सुरुवात झाली होती. लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या होत्या. अशोक सराफ यांच्या साडेसात फुटांच्या फ्लायरच्या त्यांनी चिंध्याच केल्या होत्या. इतकंच नव्हे तर नाटकाच्या गाडीखाली झोपलेल्या नाटकाच्या ड्राइव्हरलाही बाहेर काढून मुस्काटात मारली होती. नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे जेव्हा रस्त्यावर पोहोचले, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. अखेर एक सायकलरिक्षा नानांनी थांबवली आणि त्यात दोघं जण बसले. परंतु रिक्षावाला वयस्कर असल्याने त्याला दोघांचं वजन झेपत नव्हतं. अखेर नानांनी त्याला त्याला मागच्या बाजूला बसवलं आणि स्वत: रिक्षा ओढू लागले. आजही ती आठवण आली की माझ्या अंगावर शहारा येतो, असं अशोक सराफ म्हणतात.

“नाना नसता तर त्या लोकांनी मला मारलंच असतं. नाटक न झाल्याचा सर्व राग माझ्यावर काढला असता”, असं त्यांनी आत्मचरित्रात नमूद केलंय. रिक्षा ओढत नानांनी अशोक सराफ यांना एका रेस्ट हाऊसवर आणलं. तिथे एका खोलीत बंद करून ठेवलं. मग हाफपँट आणि डोक्यावर रुमाल बांधून पुन्हा बाकीच्या लोकांच्या मदतीसाठी थिएटरच्या दिशेनं निघाले. त्यावेळी नानांनी जे केलं त्याची परफेड मी कधीच करू शकत नाही, अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.