AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेटवरून पोलिसांनी सलमानसह सर्वांना नेलं अन्..; ‘हम साथ साथ है’मधील अभिनेत्याने सांगितली घटना

'हम साथ साथ है' या चित्रपटासाठी शूटिंग करताना सलमान खानवर काळवीट शिकारीचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी सेटवर नेमकं काय घडलं होतं आणि त्यानंतरचं वातावरण कसं होतं, याविषयी चित्रपटातील अभिनेत्याने सांगितलं.

सेटवरून पोलिसांनी सलमानसह सर्वांना नेलं अन्..; 'हम साथ साथ है'मधील अभिनेत्याने सांगितली घटना
Salman Khan and Mahesh ThakurImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2024 | 9:07 AM
Share

सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘हम साथ साथ है’ हा चित्रपट आजही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सलमान खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, मोहनिश बहल यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. यांसोबतच नीलम कोठारी, महेश ठाकूर, रिमा लागू आणि आलोक नाथ यांनीसुद्धा चित्रपटात काम केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटात आनंद बाबूची भूमिका साकारलेले अभिनेते महेश ठाकूर यांनी शूटिंगदरम्यानची एक घटना सांगितली. ही घटना सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणातील आहे.

सलमान खान रात्रभर पोलीस ठाण्यात

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत महेश ठाकूर यांनी सांगितलं की, शूटिंगदरम्यान पोलिस सेटवर आले होते आणि त्यांनी सेटवरील सर्वांना पोलीस ठाण्यात नेलं होतं. त्यावेळी सेटवरील वातावरण अत्यंत वाईट होतं, असंही महेश यांनी सांगितलं. ‘हम साथ साथ है’मधील एका गाण्याचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी पोलिस सेटवर आले आणि त्यांनी प्रत्येकाला पोलीस ठाण्याला नेलं. “मी, मोहनिश बहल आणि करिश्मा कपूर त्या वादात सहभागीसुद्धा नव्हतो. त्यात फक्त पाच जणांचा समावेश होता. नंतर महिलांना पोलिसांनी सोडलं. पण माझ्या मते सलमान भाई रात्रभर पोलिसांसोबत होता. त्यानंतर त्याचे भाऊ अरबाज खान आणि सोहैल खान तिथे आले. दुसऱ्या दिवशी शूटिंगदरम्यान सलमान एकदम ठीक होता”, असं महेश ठाकूर म्हणाले.

सेटवरील वातावरण

“दुसऱ्या दिवशी जेव्हा शूटिंगला सुरुवात झाली, तेव्हा सलमान सेटवर एकदम ठीक होता. कूल डूड असल्यासारखं तो वागत होता. सैफसुद्धा सर्वसामान्यांप्रमाणे वागत होता. या घटनेनंतर ती बातमी वणव्यासारखी पसरली होती. सलमान खान आणि सैफ अली खान ही दोन नावं त्यात समाविष्ट असल्याने लोकांनी त्याचा मोठा वाद केला. पण अखेर त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पण त्यावेळी जोधपूरमधील शूटिंग रद्द करण्यात आलं होतं आणि संपूर्ण कलाकारांना माघारी पाठवलं गेलं होतं”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

त्या घटनेनंतर सेटवरील वातावरण नेहमीप्रमाणेच सर्वसामान्य होतं, असं महेश ठाकूर म्हणाले. “सर्वकाही ठीक होतं. प्रत्येकाला प्रत्येकजण माहित होतं. तुम्ही हे केलं का, असा प्रश्न कोणी कोणाला विचारलं नाही. कामातील प्रामाणिकपणा सेटवर दिसत होता. पण आम्हाला आठ दिवस अधिक शूटिंगला द्यावे लागले होते. जेव्हा केस झाली, तेव्हा तारखांमुळे आम्हाला आठ दिवस जास्त शूटिंग करावं लागलं होतं”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.