AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Husnn Hai Suhana Song Out : ‘कुली नंबर 1’ चे आणखीन एक गाणे रिलीज वरुण आणि साराची जबरदस्त केमिस्ट्री!

सारा अली खान आणि वरुण धवनचा आगामी ‘कुली नंबर १’ चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज झाले आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

Husnn Hai Suhana Song Out : 'कुली नंबर 1' चे आणखीन एक गाणे रिलीज वरुण आणि साराची जबरदस्त केमिस्ट्री!
| Updated on: Dec 09, 2020 | 2:49 PM
Share

मुंबई : सारा अली खान आणि वरुण धवनचा आगामी ‘कुली नंबर १’ चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज झाले आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. हुस्न है सुहाना या गाण्या अगोदरच या चित्रपटाचे काही गाणे रिलीज झाले आहेत. हे गाणे गोविंदाच्या कुली नंबर 1 चित्रपटातील हिट गाणे हुस्न है सुहानाचे रिमेक आहे. (Another song of Coolie No. 1 released)

चंदना दीक्षित आणि अभिजीत भट्टाचार्य यांनी हुस्न है सुहाना हे गाणे गायले आहे. या गाण्याला संगीत तनिष्क बागची आणि आनंद मिलिंद यांनी दिले आहे आणि हे गाणे समीर अंजन यांनी लिहिले आहे. गाण्यात सारा आणि वरुण जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री मस्त आहे. वरुण धवन आणि सारा अली खान त्यांच्या या चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन करत होते. यापूर्वी चित्रपटातील तेरी भाभी हे गाणे रिलीज झाले होते. वरुण धवन कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून चित्रपटाचे प्रमोशन करणे त्याने थांबवले आहे. अलीकडेच वरुणने हे एक पोस्ट शेअर करत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. 25 डिसेंबर रोजी वरुणचा ‘कुली नंबर 1’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे डिजिटल प्रदर्शन

डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘Coolie No 1’ हा चित्रपट 25 डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि वरुण धवन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून देशभरातील चित्रपटगृह बंद होती.

चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अनेक महिने वाट पाहिली, परंतु कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. त्यामुळे अखेर निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटात वरुण आणि सारासह परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्याच 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर वन’ चित्रपटाचा रिमेक आहे. जुन्या चित्रपटात अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिष्मा कपूर, कंचन, कादर खान, शक्ती कपूर आणि हरीश कुमारसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

Coolie No. 1|‘कुली नंबर 1 पुन्हा एकदा ट्रोल, वरुण धवनवर चाहते भडकले

Rahul Roy | राहुल रॉय यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, ‘स्ट्रोक’ चित्रपटातून करणार पुनरागमन!

(Another song of Coolie No. 1 released)

Follow Us
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात