‘मी आज खूप आनंदी, हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल’; Puratawn बद्दल काय म्हणाल्या रितुपर्णा सेनगुप्ता?
ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची एका बंगाली सिनेमातून दमदार वापसी होत आहे. Puratawn असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता यांनी देखील भूमिका साकारली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची एका बंगाली सिनेमातून दमदार वापसी होत आहे. Puratawn असं या सिनेमाचं नाव आहे. तब्बल 14 वर्षांनंतर त्यांनी चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. आई आणि मुलीच्या जटील नात्यावर हा चित्रपट भाष्य करतो. या बंगाली सिनेमातून एका 80 वर्षीय व्यक्तीच्या जीवनातील भूतकाळ आणि वर्तमान काळातील आठवणींच्यामधील संबंधांचं दर्शन घडतं. शर्मिला टागोर यांनी या सिनेमात अत्यंत दमदार अभिनय केला आहे. त्यांनी व्यक्तीरेखा अक्षरश: जिवंत केली आहे. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा असा त्यांचा अभिनय आहे.
सुमन घोष यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये शर्मिला टागोर यांच्यासोबत रितुपर्णा सेनगुप्ता आणि इंद्रनील सेनगुप्ता यांनी देखील भूमिका केली आहे. या सिनेमात शर्मिला टागोर यांची मुख्य भूमिका आहे. तर रितुपर्णा सेनगुप्ता यांनी त्यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. मला आज खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता यांनी दिली आहे.
‘मी आज खूप आनंदी आहे, हा चित्रपट आमच्यासठी खूप स्पेशल आहे. या चित्रपटामध्ये शर्मिला टागोर यांची मुख्य भूमिका आहे. त्यांनी तब्बल 14 वर्षानंतर चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. ही केवळ एक बंगाली फिल्म आहे, असं मी म्हणणार नाही, कारण ही एक इंडियन फिल्म आहे. कारण या चित्रपटाला आम्ही सबटायटल्स पण दिलं आहे. त्यामुळे सर्व लोक या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. या चित्रपटाचं विशेष आकर्षण म्हणजे या चित्रपटामध्ये शर्मिला टागोर यांची भूमिका आहे, आणि माझा मदर -डॉटर स्टोरीचा एक ब्युटीफूल अँगल आहे. सुमन घोष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मी एवढंच सांगेल चित्रपटगृहात या हा चित्रपट पाहा, आणि सोबत एक चांगला अनुभव घेऊ जा. प्रेक्षकांसाठी हा एक खास अनुभव देणारा चित्रपट आहे. आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये जे काही सुरू आहे, त्याची खास झलक तुम्हाला या चित्रपटामधून पाहायला मिळू शकते. या चित्रपटामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या प्रेक्षकांना आवडतील, असं रितुपर्णा सेनगुप्ता यांनी म्हटलं आहे.’
