प्रसिद्ध अभिनेत्री शहिदाची लेक, वेदना व्यक्त करत म्हणाली, मी माझ्या वडिलांना काश्मीरमध्ये…

Bollywood Actress: 'मी माझ्या वडिलांना काश्मीरमध्ये...', शहिदाची लेक आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर व्यक्त केल्या भावना, सध्या सर्वत्र भारत - पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावग्रस्त वातावारणाची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्री शहिदाची लेक, वेदना व्यक्त करत म्हणाली, मी माझ्या वडिलांना काश्मीरमध्ये...
ऑपरेशन सिंदूर
| Updated on: May 09, 2025 | 2:11 PM

Bollywood Actress: जम्मू – काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म विचारत 26 जणांवर गोळ्या झाडल्या. हल्ल्यात अनेक जण जखमी देखील झाले. 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याचा बदला भरताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत घेतला. भारताने सुरुवातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर भारतीयांना पाठिंबा दिला आहे.

सेलिब्रिटींनी देखील ‘ऑपरेशन सिंदूर‘ला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, एका अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. जिचे वडील काश्मीरमध्ये शहीद झाले आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री निमरत कौर आहे. तिच्या वडिलांचं नाव मेजर भूपेंद्र सिंग होतं, त्यांना शौर्यासाठी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं.

 

 

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री ‘ऑपरेशन सिंदूर‘ ला पाठिंबा देखील भावना व्यक्त केल्या आहेत. ‘पहलगाममध्ये जे काही झालं ते आपण सर्वांनी फार जवळून पाहिलं आहे. मी एका शहीदाची मुलगी आहे. 1994 मध्ये काश्मीरमध्ये मी माझ्या वडिलांना गमावलं आहे. अशा वेळी कशी वाईट परिस्थिीती समोर येते हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि ही फार दुःखद गोष्ट आहे.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘फक्त देशातच नाही तर, जगातही दहशतवादाला स्थान नसावं. लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. लोकं मुलं आणि पत्नीसह सुट्टीसाठी शांत ठिकाणी गेले होते. पण तेथे हल्ला झाला. देशाची नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी सैन्य आणि भारत सरकारच्या पाठीशी उभं राहीलं पाहिजे… दहशतवादी हल्ले आता थांबलेच पाहिजे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.

निमरत कौर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण ‘लंचबॉक्स’मुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. निमरत हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.