AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांतारा 2 च्या शुटिंग दरम्यान अभिनेत्याचा मृत्यू, नदीत आढळला मृतदेह, धक्कादायक माहिती समोर

Kantara 2: 'कांतारा 2' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याने गमावले प्राण, नदीत आढळला मृतदेह, धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर कठोर कारवाईची मागणी..., अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर

कांतारा 2 च्या शुटिंग दरम्यान अभिनेत्याचा मृत्यू, नदीत आढळला मृतदेह, धक्कादायक माहिती समोर
| Updated on: May 09, 2025 | 12:12 PM
Share

Kantara 2: ऋशभ शेट्टी स्टारर ‘कांतारा 2’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ज्यूनियर अभिनेता एमएफ कपिल याचं निधन झालं आहे. अभिनेत्यात्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. दुर्दैवी अपघातामुळे अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती प्रॉडक्शन टीमने दिली आहे. तर दुसरीकडे AICWA (ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन) ने या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. रिपोर्टनुसार, 6 मे 2025 मध्ये सौपर्णिका नदीत बुडून अभिनेत्याचा मृत्यू झाला.

सिनेमाचे निर्माते ऋषभ शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल नदी पोहत होता, याच दरम्यान त्याचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, शुटिंग पूर्ण झाल्यानंतर कपिल कोल्लूरमधील सौपर्णीका नदीत पोहण्यासाठी गेला होता परंतु जोरदार प्रवाहात तो वाहून गेला.

अभिनेता नदीत वाहून गेल्याचं कळताच अग्निशमन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केलं आणि संध्याकाळी त्याचा मृतदेह सापडला. या प्रकरणी कोल्लूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

सर्व संभाव्य कारणांची चौकशी करण्याचे आवाहन AICWA ने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. एवढंच नाही तर, सेटवर सतत होत असलेल्या मृत्यूच्या घटनांवर असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे.

असोसिएशनचं म्हणणे आहे की, यापूर्वीही इंडियन 2 आणि सरदार 2 सारख्या सिनेमांच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाले आहेत आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या बस अपघातात 20 ज्यूनियर कलाकारांचा मृत्यू झाला. संबंधित अपघाताची देखील माहिती समोर आली नाही.

दरम्यान, अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबाला 1 कोटी भरपाई देण्याची मागणी AICWA ने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्याकडे केली आहे. असोसिएशनने ऋषभ शेट्टी आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणीही केली आहे. यासोबतच, AICWA ने ‘कांतारा 2’ च्या निर्मात्यांना कपिलच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे.

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा ‘कंतारा 2’ सिनेमाच्या सेटवर अपघात झाला आहे. काही दिवसांपूर्वी, शूटिंग ठिकाणाहून परतत असताना ज्युनियर कलाकारांना घेऊन जाणारी बस उलटली आणि मुसळधार वादळ आणि पावसामुळे सेटचंही नुकसान झालं.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.