AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इब्राहिम अन् पलक तिवारी रात्री मूव्ही डेटवर; पापाराझींना पाहताच दोघेही लाजले तर साराही भावाला चिडवू लागली

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांच्या अफेअरच्या चर्चा आता जास्तच होऊ लागल्या आहेत कारण. दोघांनाही नुकतंच रात्री मूव्ही डेटवर पाहिलं. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत सारा अली खानही होती.  पलक आणि इब्राहिम पापाराझींना पाहून ते लाजलेले दिसले.

इब्राहिम अन् पलक तिवारी रात्री मूव्ही डेटवर; पापाराझींना पाहताच दोघेही लाजले तर साराही भावाला चिडवू लागली
Ibrahim Ali Khan, Palak Tiwari on a movie dateImage Credit source: instagram
| Updated on: May 30, 2025 | 10:43 AM
Share

बॉलिवूडचे सेलिब्रिटी किड्स असलेला इब्राहिम अली खान हा सध्या त्याच्या बॉलिवूड एन्ट्रीमुळे चर्चेत असतो. इब्राहिम अली खान फक्त चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. जसं की, इब्राहिम अली खानचे नाव हे पलक तिवारी यांच्यातील नात्याची नेहमीच चर्चा होताना दिसते. दोघांनाही अनेक वेळा एकत्र पाहिले गेलं आहे. पण आता ते नेहमीपेक्षा जास्त एकत्र दिसतात.

इब्राहिम अन् पलक तिवारी रात्री मूव्ही डेटवर

पलक आता फक्त इब्राहिमसोबतच नाही तर त्याच्या कुटुंबासोबतही दिसू लागली आहे. गुरुवारी रात्री मूव्ही डेटवर आलेले पाहायला मिळालं. पण यावेळी इब्राहिम, पलकसह सारा अली खानही होती. हे तिघेही एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी तिघेही एकत्र दिसले.मुंबईतील पीव्हीआर जुहू येथे चित्रपट पाहण्यासाठी गेले होते.

पापाराझींना पाहाताच इब्राहिम आणि पलक लाजले

मात्र पापाराझींना पाहाताच इब्राहिम आणि पलक थोडेसे लाजलेले दिसले. तसेच तो कॅमेऱ्याकडेही पाहत नव्हता. दरम्यान, सारा देखील हसत हसत निघून गेली आणि इब्राहिमला चिडवताना दिसली. पलकनेही कॅमेऱ्याकडे न पाहता ती थेट निघून गेली. दोघांनीही हुडी टीशर्ट घातला होता तर साराही अगदी कॅज्यूअल कपड्यांमध्ये दिसली. तिघेही पापारांझींकडे न पाहता तिघेही शांतपणे लिफ्टमध्ये गेले. बरं, हे तिघांनीही असा एकत्र वेळ घालवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही हे तिघे सुट्टीसाठी गोव्याला एकत्र गेले होते.

गोव्याला एकत्र सुट्टी घालवली एका मुलाखतीत इब्राहिमने स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला होता. तेव्हा त्याला विचारण्यात आलं की तो सिंगल आहे का? यावर इब्राहिमने आधी हो म्हटलं होतं आणि नंतर लगेच ‘नाही’ म्हटलं. त्याचं हे उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं आणि तेव्हापासून पलक आणि इब्राहिमच्या नात्यांबद्दल फारच चर्चा होऊ लागली आहे. तसेच तिघांचा हा व्हिडीओही प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.

कामाबद्दल बोलायचं झाल्यास

त्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास इब्राहिमने अलीकडेच ‘नादानियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पलकने सलमान खानच्या ‘ किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून पदार्पण केले होते . त्यानंतर ती मौनी रॉय, संजय दत्त आणि सनी सिंग यांच्या अभिनयाने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूतनी’ चित्रपटात दिसली.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.